खेळामुळे स्वयंशिस्त आणि सहकार्यभावना वाढते : डॉ.मनोज साठे. 

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- शालेय जीवनापासून विविध खेळांमध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त  आणि सहकार्यभावना वाढत असल्याचे मत मॉडर्न इन्स्टि ट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज कॉलेजचे प्राचार्य डॉ.मनोज साठे यांनी व्यक्त केले.
  • यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या वार्षिक क्री डा महोत्सव उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
  • यावेळी मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा साब ळे, निगडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप दळवी,पोलीस हवालदार प्रकाश गरदरे,पर्यवेक्षक विजय पाचारणे,संस्था सदस्य राजीव कुटे,क्रीडा शिक्षक गंगाधर सोनवणे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
  • यावेळी डॉ.मनोज साठे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.त्यांनी विद्यार्थ्यांना महाभारतातील कृष्ण-अर्जुनाच्या गोष्टी सांगत स्वतःबरोबर इतरांचा विचार कर ण्याचा सल्ला दिला.
  • खेळामुळेच विद्यार्थ्यांत संघभावना निर्माण होत असल्याने अधिकाधिक मुलांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे ते म्हणाले.
  • यावेळी दोन दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात लंगडी, कबड्डी,थ्रो बॉल,रस्सीखेच अशा विविध स्पर्धा खेळीमेळी च्या वातावरणात पार पडल्या.
  • या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाहक प्रा.डॉ.निवेदिता एक बोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हीजिटर प्रमोद शिंदे यांनी कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles