
सैराट मैत्री ग्रुप विरार या व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या मित्रांची वृध्दाश्रमाना भेट.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- समाजाचे काही देणे लागतो या निस्वार्थी भावनेने सैराट मैत्री ग्रुप विरार या व्हा ट्सअप समूहाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या मित्रांनी वृद्धाश्रमाना भेट दिली.
- सैराट मैत्री ग्रुप विरार या व्हाट्सअप समूहातील मैत्रीचा ए क निखळ झरा | समाजसेवा हाच मार्ग खरा मनाशी जिद्द बाळगून १० ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील लोकक ला आणि संस्कृती जपत परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अन ग्रामदैवत देव रवळनाथ, दक्षिण काशी मा नल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर, देव रामेश्वर, हरिहरेश्व राच्या कृपा आशिर्वादामुळे वसलेली कोकण भूमी आणि याच कोकणातील एक लोककला कोकणचा कलगी तुरा लोककलेच आयोजन करून रसिकानाही समाजसेवेची ओढ लागावी यासाठी केलेला पहिला वहिला प्रयत्न सफ ल झाला.

- त्यातून छोटासा निधी उभा करत एक संकल्पना सूचली ती वृद्धाश्रमाना भेट वस्तू द्यायची. आणि तेथील वृद्धाना अन्न व वस्त्र सेवा हा सामाजिक उपक्रम हाती घेण्याचं ठर लं आणि तो दिवस उजाडला.
- रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी वसई विभागात अविरत ओल्ड एज वृद्धाश्रम अन सुख ओल्ड एज वृद्धाश्र म या सदर वृद्धाश्रमात सकाळी नाश्ता व तेथील वृद्धाश्र मात राहणाऱ्या वृद्धाना काही दिवस पुरेल अशी अन्न सेवा सोबत हिवाळ्याचा विचार करून प्रत्येकी ब्लॅंकेट भेट व स्तू स्वरूपात देण्यात आले.
- त्याच वेळी भेटी दरम्यान तेथील अविरत वृद्धाश्रम चालव णारे अर्चना मोहिते व विजय मोहिते कुटुंबं यांना गहिवरू न आलं ते यासाठी याठिकाणी अनेक संस्था, मंडळे मदत देत असतात आम्ही ती स्वीकार करतो.
- परंतु खास पश्चिम रेल्वेतील भजनी मंडळ आणि त्यातील काही तरुण एकत्रित येऊन एका व्हाट्सअप समूह द्वारे अशीही एक समाजसेवा करतात. हे एक वेगळंपण आज आम्हाला पहायला मिळाल.
- हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा | ही हरीना माची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हस्ते परस्ते दिलेलं दान वाया जातं नाही याचच एक हे त्यातील मूर्तिमंत उदा हरणं.
- अखेर शेवटी भजनवाले म्हटलं तर स्वतः साहित्य सोबतच घेऊन गेलेलं असल्यामुळे तेथे आश्रमात भजन सेवा ही रंगलीच आणि त्याचा आनंद तेथील वृद्धानी घेतला. आणि तेथून पाऊल निघताना जड वाटू लागली.
- तरीही मनाशी तडजोड करत दुसऱ्या आश्रमकडे वळलोच जायला. आपण निवडलेला रस्ता एकदा वाचता आला,की मग विचारांचं विश्व समृद्ध होतं.
- लक्ष ठरलेलं असेल अथवा नसेल चालायचं तर सगळ्यांना च असतं. त्यासाठी चालतांना फक्त नजरेत क्षितिज गाठा यचं अन् विचारात आभाळ उतरून ठेवायच असत.
- असा वृद्धाश्रम चालवणारे म्हणजे श्री दिपक काते अन त्यांचे बंधू यांचे सुख वृद्धाश्रम आयुष्यात जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधीच नांव ठेवायचं नसतं कारण शिळी भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपले पोट भरले होते.
- चप्पल आज तुटली आहे .काल तिने आपल्याला चालता ना आधार दिला होता. म्हणून आयुष्य जगताना उपयोगी पडलेल्या व्यक्तींना कधीही विसरू नका ज्यांनी जन्म दि ला, हाताचा केला पाळणा, नेत्राचा केला दिवा, म्हणून अ श्या आईबापाला वृद्धाश्रमात सोडू नका.
- जन्मदात्या मायबापाला जो विसरला तया हसती लोक रे कवडी मोल धन्य हे सारे कमविले तू लाख रे सदर वृद्धाश्र मात नाश्ता व तेथील वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धाना काही दिवस पुरेल अशी अन्न सेवा सोबत हिवाळ्याचा विचार करून प्रत्येकी ब्लॅंकेट भेट वस्तू स्वरूपात देण्यात आले.
- लोककलेसाठी आयोजित कार्यक्रमाला आपण प्रतिसाद दिला आणि जें सहकार्य केले व त्यातून काही मिळालेल्या मोबदल्याचे समाजकार्यासाठी उपयोग करता आला याचा परमानंद आहे.
- एक कार्यक्रमाच्या निधीतून मिळालेला निधी त्याचा योग्य वापर करत. रसिकानी दिलेली साथ अन केलेलं सहकार्य यामुळेच आम्ही आज या सामाजिक बांधिलकी जपण्या चा प्रयत्न करू शकलो अन समाजकार्यात भरारी घेऊ शकलो.
- समाजकार्यात सहकार्य केलेल्या सर्व समाज दात्यांचे आ म्ही सैराट मैत्री ग्रुप विरार यांनी आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











