
अंतरराष्ट्रीय शांती शिक्षण विभागाचे संचालक व्हिक्टोरिया मुत्तुम यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार घेताना शिक्षक बाळु कांबळे कुंटुबियासह.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- तालुक्यातील डोणजे विद्या लय डोणजे येथे कार्यरत शिक्षक बाळू मच्छिंद्र कांबळे यां ना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यां क शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे कडून सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे जाग तिक शिक्षक दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात कां बळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल आं तरराष्ट्रीय शांती शिक्षण विभागाचे संचालक व्हिक्टोरिया मुत्तुम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
- या कार्यक्रमासाठी उपआयुक्त राहुल मोरे,उपसंचालक दी पक चौने, शिक्षण आयुक्त पुणे रावसाहेब मिरगणे, शिक्षण निरीक्षक घनश्याम भोसले, वैभव गीते,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव सत्यजित जानराव आ दी उपस्थित होते.
- कांबळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक आप्पासाहेब सूर्यवंशी, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्म चारी, पारेवाडी ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवाराकडुन ” अभिनंदन करण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











