
दि.२० डिसेंबर रोजी मुंबई मराठी साहित्य संघात होणार श्री.आई जाखादेवी कलामंच मुंबई (भालावली) यांच्या नमनाच्या शुभारंभाचा कार्यक्रम.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कोकणच्या मातीतील अस्सल लोककलेची परंपरा जपणारा आणि विशेषतः स्त्री पात्रांनी नटलेला मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे “नमन” श्री.आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली -राजापूर) प्रस्तुत हा कार्यक्रम शनिवार दि.२० डिसेम्बर २०२५ रोजी रात्री ठीक ८:०० वाजता मुंबई मराठी साहि त्य संघ नाट्यगृह, चर्नीरोड, मुंबई येथे सादर होणार आहे.
- कोकणची पारंपरिक संस्कृती या कार्यक्रमात मनोरंजना द्वारे पाहायला मिळणार आहे.

- तसेच सुमधुर संगीत, लयबद्ध नृत्य, भक्तिमय गण आणि लोटपोट हसायला लावणारी सवंगड्यांची धम्माल तसेच मावशीची हुकाणेशाही पद्धतीने केलेले मनोरंजन रसिक प्रेक्षकांच्या हृदयात स्थान धरून बसलेले आहे.
- अशा पद्धतीने गौळण सादर करून हृदयस्पर्शी, वास्तववा दी कौटुंबिक – काल्पनिक नाट्यकलाकृती “खेळ दैवाचा” सामाजिक वास्तव्यावर भाष्य करणारी आणि रसिक प्रेक्ष कांच्या मनाला स्पर्श करणारी आहे.
- कोकणासहित मुंबईत कार्यक्रमाच्या प्रत्येक गाण्यात वन्स मोर घेणारी आणि मंजुळ आवाजात मंत्रमुग्ध करणारी गा यिका कु.मोनिका चव्हाण हिच्या आवाजाची भुरळ रसिक प्रेक्षकांना पडलेली आहे.
- तसेच गायक कु. सुयोग जोशी यांनी सुद्धा आपले स्थान कायम ठेवलेले आहे.
- लेखक / गीतकार श्री. महेंद्र दिनकर जोशी यांची लेखणी तसेच गीतकार/गायक : रवींद्र सूद आणि दिगदर्शक श्री.स चिन नारायण सांडये तसेच अध्यक्ष मा.श्री.भरत वसंत गुर व, सल्लागार:श्री.विशाल गुरव , श्री.सचिन शेंडेकर, संपर्क प्रमुख: योगेश विखापे, गजानन विखापे आणि संपूर्ण का र्यकारिणी मंडळ यांच्या सहकार्याने सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
- कार्यक्रमाच्या आगोदर तब्बल ३५ दिवसातच नाट्यगृहाती ल आसन ९०% बुकिंग झाले असून रसिक प्रेक्षकांनी शु भारंभाच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद दिल्याचे सूत्रधार श्री.विश्वास वामन गुरव यांनी सांगितले आहे.
- अधिक माहितीसाठी सचिन सांडये _ 92202 80201, विश्वास गुरव 8655536457 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन कलामंच तर्फे करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











