
अभिजात भाषा म्हणजे स्वतंत्र साहित्यिक व सांस्कृतिक वारसा असलेली भाषा – जनसेवक गणेशभाऊ खेडेकर.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-महाराष्ट्र कामगार कल्याण मं डळ सांताक्रूझ आयोजित अभिजात भाषा सप्ताह दिन ०३ ऑक्टोंबर ते ०९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सान्ताक्रुझ येथे पार पडला.
- सदर कार्यक्रमाला समाज भूषण आपला माणुस गणेश भाऊ खेडेकर जनसेवक यांना प्रमुख वक्ते म्हणून प्राचारण करण्यात आले होते.
- यावेळी श्री खेडेकर यांनी अभिजात भाषा संदर्भात सवि स्तर माहिती सांगितली.जसे अभिजात मराठी भाषा दिव स ०३ ऑक्टोबर रोजी असतो.

- अभिजात भाषा म्हणजे अती प्राचीन भाषा, जिचा स्वतः चा समृद्ध आणि स्वतंत्र साहित्यिक व सांस्कृतिक वारसा आहे.
- असे प्रतिपादन श्री खेडेकर यांनी यावेळी केले जी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. तिचे मूळ स्वरूप अजूनही टिकून आहे.
- भारत सरकारने अनेक भाषांना या निकषांवर आधारित अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे,जसे की तमिळ, सं स्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम, ओडिया, आणि आताच मराठी, पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या भाषांना अ भिजात भाषेचा दर्जा देण्यात आले आहे.
- केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही नि कष ठरवते भाषा प्राचीन असावी, भाषेचे वय साधारण पणे दीड ते अडीच हजार वर्षांहून अधिक जुने असावे.
- साहित्य श्रेष्ठ असावे भाषेमध्ये प्राचीन आणि उच्च प्रतीचे साहित्य निर्माण झालेले असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभू आणि स्वतंत्र अस्तित्व असावे.
- आधुनिक रूपातील मूळ गाभा कायम असावा प्राचीन भा षेचे आधुनिक रूप असले तरी, त्यातील मूळ गाभा कायम टिकून राहावा.
- अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषेच्या समृद्ध परंपरे ला आणि सांस्कृतिक वारशाला मान्यता मिळते.
- यामुळे त्या भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळते आणि तिच्या जतन व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
- उदाहरणे भारतात तमिळ ही पहिली अभिजात भाषा म्हणून मान्यताप्राप्त भाषा ठरली.अलीकडेच मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
- ज्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फा यदे केंद्रात आणि राज्यांमध्ये संशोधन केंद्रे उभारू शकतो, प्राचीन ग्रंथांचे जतन करून शकतो, त्यांचे भाषांतर करू शकतो, डिजिटायझेशन आणि प्रकाशन करू शकतो, रा ष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळतात, शै क्षणिक, संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि बहुतेक दोन वर्षांत या निर्णयाची अंमलबजावणी होते.

- तसेच प्राथमिक अंमलबजावणी सांस्कृतिक मंत्रालया क डून होते. भारतातील ४00 हून अधिक विद्यापीठांत मरा ठी भाषा शिकविली जाऊ शकते.
- यामुळे महाराष्ट्राती ल ग्रंथालय चळवळ सशक्त होईल अ से महत्वपूर्ण मार्गदर्शन उपस्थितांना गणेशभाऊ खेडेकर यांनी दिले.
- व्यासपीठावर समाज सेविका सौ.अंकीता तोंडवळकर. कें द्र प्रमुख सौ.सुष्माताई सावरटकर,आणि केंद्र सेवक मजर खान, यांनी उपस्थितांना पुष्पगुच्छ आणि मानसन्मान देऊन स्वागत केले.
- कार्यक्रमानंतर चहा पाण्याचा देखील कार्यक्रम खुप छान झाला.केंद्र प्रमुख सौ. सावरटकर यांनी मार्गदर्शन तत्पर माहिती देऊन उपस्थितीताचे आभार प्रदर्शन करून कार्य क्रमाची सांगता केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











