
सत्यवान रेडकर सरांचे आज मीरारोड मध्ये निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- समर्पित सामाजिक संस्था, म हाराष्ट्र राज्य व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, शनिवार २३ ऑगस्ट २०२५ रोजी सका ळी १०.०० वाजता,भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, मी रारोड (पू) येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
- प्रमुख मार्गदर्शक स्वरूपात तिमिरातूनी तेजाकडे या शैक्ष णिक चळवळीचे प्रणेते,उच्चविद्याविभूषित, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व मुंबई सीमाशुल्क विभागात कार्यरत असणारे श्री सत्यवान यशवंत रेडकर मार्गदर्शन करणार आहेत.

- या सामाजिक संस्थेने दूरदृष्टिकोन ठेवून तळागाळातील विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी भव्य दिव्य सभागृहामध्ये आयोजन केले आहे.
- विविध करियर संबंधी माहिती लिहून घेण्यासाठी वही व पेन घेऊन उपस्थित रहावे.
- कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नसून सर्व प्रवर्गातील विद्या र्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व इतरांसोबत जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन कर ण्यात आलेले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











