
वाघाचा वरूड शेतशिवारात शिरकाव; शेतकऱ्यांमध्ये दहशत वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- वरूड-झूली शेतशिवारात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी वाघाची डरकाळीने शिरकाव झाल्याची घटना उघडकीस आली असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- शेतकरी व शेतमजूर हे रब्बी हंगामातील कामांसाठी शेता त जात असताना अचानक वाघाचे पाऊलखूण दिसल्याने सर्वत्र धास्ती पसरली आहे.
- हातगाव येथील काही शेतकऱ्यांची शेती ही वरुड शेत शि वारात असल्याने तेथील काही शेतकर्यांना या पाऊलखु णा आढळताच ही माहिती वन विभागाला दिली.
- वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थि तीची पाहणी केली. शेतकरी व मजुरांनी शेतात एकट्याने न जाण्याचा सल्ला देत काळजी घेण्याचे आवाहन वन वि भागाकडून करण्यात आले आहे.

- तसेच परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू अस ल्याची माहितीही विभागाने दिली.
- गेल्या काही दिवसां पासून परिसरात वन्यजीवांच्या हाल चाली वाढल्याने जनावरांवरही धोका निर्माण झाला आहे.

- शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांध ण्याची आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सतर्क राहण्या ची सूचना प्रशासनाने केली आहे.

- ग्रामीण भागात निर्माण झालेल्या दहशतीमुळे शेतकऱ्यां मध्ये चिंतेचे वातावरण असून वाघाच्या हालचाली रोख ण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











