
दत्तजयंतीचे औचित्य साधत आचार्य दीपक दीक्षित (गणू महाराज) यांच्याकडून म्हसदी गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :-दत्तजयंतीचा पवित्र दिवस म्ह णजे अध्यात्म,दानशीलता आणि माणुसकीचे खरे मूल्य उ जाळणारा दिवस. ह्याच दिवशी समाजसेवक, दानशूर व्य क्तिमत्त्व आणि ग्रामपुरोहित आचार्य दीपक रत्नाकर दीक्षि त(गणू महाराज) यांनी म्हसदी गावात एक अनुकरणीय उ पक्रम राबवत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला.
- माणुसकीची जाणीव हरवत चाललेल्या काळात “आपण सगळ्यांचे देणे लागतो”ही महाराजांची उक्ती जीवंत ठेवत, गावच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहणा ऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा त्यांनी विशेष सन्मान केला.

- गावात स्वच्छता ही केवळ एक सेवा नसून समाजाचे आ रोग्य, नीटनेटकेपणा आणि संस्कृतीचे दर्पण असते.
- या कार्याची जबाबदारी निभावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यां कडे सहसा दुर्लक्ष होते. पण आचार्य गणूजी महाराजांनी या कर्मवीरांच्या त्यागाचे मोल ओळखत त्यांना ड्रेस, साडी, शाल आणि नारळ देऊन सन्मानित केले.
- हा सन्मान म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर त्यांच्याविष यी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मनोभावे केलेला प्रयत्न होता.
- महाराजांच्या हस्ते झालेला हा गौरव पाहून स्वच्छता कर्म चाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि अभिमानाची झ ळाळी दिसून आली.
- गावाच्या प्रगतीत आणि आरोग्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे.
- त्यांच्यामुळेच गाव स्वच्छ, सुंदर आणि देखणे राहते. आ चार्य गणूजी महाराजांनी त्यांच्या कार्याचा सन्मान करून समाजापुढे एक संदेश दिला –
- मानवी मूल्ये जपायची असतील तर प्रथम त्यांची कदर करा जे समाजासाठी निःस्वार्थ सेवा करतात.
- दत्तजयंतीसारख्या पवित्र पर्वावर झालेला हा सन्मान सो हळा गावकऱ्यांच्या मनात आदर, एकता आणि सामाजि क बांधिलकीचे नवीन बीज पेरून गेला.
- खरंच,महाराजांच्या या उपक्रमास मनापासून सलाम!अशा संवेदनशील कार्यातून समाज अधिक सुंदर, जागरूक आ णि माणुसकीने परिपूर्ण होतो.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











