
विक्रमी पावसामुळे बोर दहेगाव मध्यम प्रकल्प एकाच रात्रीत तुडुंब….! तीन वर्षांनंतर धरण शंभर टक्के भरले, 576 क्युसेकने विसर्ग सुरू; अनेक गावांचा संपर्क तुटला.
- प्रतिनिधी : छ.संभाजीनगर : संदीप कारके :- पावसा ळ्याच्या अखेरीस,वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव मध्य म प्रकल्पात जलद गतीने पाणीसाठा होऊन तो पहिल्यां दाच पूर्ण क्षमतेने भरला आहे.
- पावसाळा जवळजवळ संपत आला असताना प्रकल्पात केवळ १९ टक्के जलसाठा होता. मात्र,शनिवारी (२८ सप्टें बर) रात्रभर झालेल्या विक्रमी पावसामुळे बोर नदीने धो क्याची पातळी ओलांडली आणि एकाच रात्रीत हा प्रकल्प १०० टक्के भरला.

- धरण भरले, बोर नदीला पूर धरण क्षेत्रातील बोरसर, भिवं गाव, परसोडा, शिवराई, बेंदवाडी, गोळवाडी या गावांमध्ये रात्रभर विक्रमी पाऊस झाला.
- यामुळे बोर नदीला आलेल्या प्रचंड पाण्यामुळे बोर दहेगा व मध्यम प्रकल्प पूर्ण भरला. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही केली.
- रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे पहिले दोन गेट १० सेमीने, तर त्यानंतर आणखी दोन गेट ६ सेमीने उघडून ५७६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
- पाण्याची आवक कायम राहिल्याने दुपारी एक वाजता उर्वरित दोन गेट देखील ४ सेमीने उघडण्यात आले.
- यामुळे धरणातून एकूण १४४० क्युसेक वेगाने पाणी बोर नदी पात्रात सोडण्यात आले.
- नागपूर-मुंबई महामार्ग बंद; अनेक गावांना सतर्कतेचा इशा रा बोर नदीच्या पात्रात विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठ च्या खिर्डी आणि जळगाव गावांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता.
- या जोरदार प्रवाहामुळे बोरसर,भिवंगांव, पारसोडा, खिर्डी, आणि जळगाव या गावांचा संपर्क तुटला होता.
- तसेच, बोर दहेगाव आणि रहेगाव चा संपर्क तुटल्याने नाग पूर-मुंबई राष्ट्रीय महामार्ग देखील दिवसभर बंद होता.
- यापूर्वी बोर दहेगाव मध्यम प्रकल्प २०२१ आणि २०२२ साली भरला होता, त्यानंतर तीन वर्षांनी २०२५ मध्ये तो पुन्हा भरण्याचा योग आला.
- यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता ए. यु. देशमुख, शाखा अभियंता पी.एफ.चव्हाण यांच्यासह राजेंद्र डेरे, आर. एच. जाधव, गणेश धोत्रे आदी कर्मचाऱ्यां नी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











