
विरेश्वर विद्यालय विरसईमध्ये लाठीकाठी व दांडपट्टा प्रशिक्षण शुभारंभ.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- आज शुक्रवार दि. 5 डिसेंबर 2025 रोजी विरसई जनसेवा मंडळ आयोजित व शालेय समिती अध्यक्ष श्री. अनिल पिंपळकर यांचे संकल्पनेतून ‘स्वसंरक्षण युद्धकला’ या उपक्रमा अंतर्गत विरेश्वर विद्याल य विरसई येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लाठी – काठी व दांडपट्टा’ या मराठामोळ्या खेळांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सकाळी ठीक 10-30 वा. सन्माननीय श्री.नितीनजी दुर्गव ले,माजी सरपंच, वांझळोली यांचे शुभहस्ते करण्यात आला.

- यावेळी राष्ट्रीय खेळाडू कु. उत्कर्षा पाटील हिने लाठीकाठी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

- यानंतर श्री.सुरेंद्र शिंदे सर यांनी लाठीकाठी खेळाचा इति हास व माहिती सांगून शालेय विद्यार्थ्यांना लाठीकाठीचे प्रशिक्षण देऊन त्यांचेकडून सराव करून घेतला.

- यावेळी प्रशिक्षक श्री.सुरेंद्र शिंदे,सौ.शिंदे मॅडम, कु.उत्कर्षा पाटील, विरसई जनसेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री.विठ्ठल मा ने, शालेय समिती अध्यक्ष श्री.अनिल पिंपळकर, जनसेवा मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष श्री.कृष्णा राणे, माजी सरपंच श्री.सुरेश वडतकर, श्री.सहदेव जाधव, श्री.धोंडू राणे, श्री. मयूर मांडवकर, श्री.सूरज पिंपळकर, श्री.शिरसाठ सर इ. मान्यवर, विरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शि क्षकेतर कर्मचारी,विदयार्थी व जि.प.शाळेचे विद्यार्थी उप स्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











