
उद्या संगणक परिचालक यांच्या हिवाळी अधिवेशनावर भव्य विशाल महामोर्चा; दरमहा मिळते केवळ तुटपुंजे मानधन : ग्रामपंचायतीच्या डिजिटल सेवेला फटका.
- प्रतिनिधी : सडक अर्जुनी : प्रदीप धावले :-ग्रामपंचाय त स्तरावर मागील १४ वर्षापासून ग्रामीण भागातील नाग रिकांना विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सं गणक परिचालकांनी बुधवारपासून राज्यभर बेमुदत ‘काम बंद आंदोलन’ सुरू केले आहे.
- ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या चार महिन्यांचे मानधन थ कीत असणे, कोरोना काळातील विमा संरक्षण व प्रोत्साह न भत्ता न मिळणे.

- तसेच कंपनीचा १८ सप्टेंबर २०२५ रोजी संपलेला करार यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर शासनाकडून होत असले ल्या दुर्लक्षाविरोधात उद्या हिवाळी अधिवेशनावर संगणक परिचालक यांचा महा मोर्चा चे आंदोलन आहे.
- ग्रामपंचायतींचे ऑनलाईन ऑफलाईन कामकाज, जन्म-मृत्यू दाखले, विवाह प्रमाणपत्र देणे, यासारखी महत्त्वाची व तांत्रिक कामे ते सातत्याने आणि प्रामाणिकपणे करत आहेत तसेच शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना जन तेपर्यत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत.
- आयष्मान भारत स्वच्छ भारत मिशन, घरकुल आवास यो जना अशा योजना राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांना केवळ ९ हजार ९०० रुपये मानधन मिळते.
- महागाईच्या काळात मानधन तुटपुंजे रक्कम असल्याची खंत संगणक परिचालकांनी व्यक्त केली. त्यातही मानधन वेळेवर न मिळाल्याने परिचालक अडचणीत आर्थिक साप डले आहेत.
- मान्य झालेल्या ३ हजार ३०० पगारवाढीची तत्काळ अंम लबजावणी करावी, कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या परिचालकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच, तसे च कोरोनाकाळात जीवाची बाजी लाऊन केलेल्या कामा साठी २३ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी त्यां नी १८ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचा करारही संपला आहे.
- याशिवाय, संगणक परिचालकांना ‘ग्रामपंचायत सहाय्यक’ असा शासकीय किंवा निमशासकीय दर्जा द्यावा, तोपर्यंत किमान वेतन कायदा लागू करावा.
- आदी मागण्यासाठी त सेच 11 डिसेंबर 2025 ला नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये कानाकोपऱ्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित राहणार आहेत.
- अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली यावेळी महारा ष्ट्र ग्रामपंचायत परिचालक संगणक संघटनेचे तालुकाध्यक्ष डेबुजी बावनकर उपाध्यक्ष अमर परशुरामकर,सचिव प्रका श वैरागडे, तसेच सर्व संगणक परिचालक आदींची उप स्थिती होती.
- ‘काम बंद’ आंदोलनामुळे ग्रामपंचायतींचे डिजिटल काम काज, विविध दाखले आणि इतर तांत्रिक प्रक्रिया ठप्प राहणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











