
साक्रीत PSI महेश गायतड यांची दादागिरी; दिव्यांग पत्रकाराला धमकी, दुसऱ्या पत्रकारावर हल्ला.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :-साक्री पोलीस ठाण्यात नुकते च रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांच्या कडून पत्रकारांवर करण्यात आलेल्या अवमानकारक वर्त नामुळे साक्री शहरातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
- दिव्यांग पत्रकाराला शिवीगाळ करून ‘हातपाय तोडण्या ची’ धमकी देणे आणि दुसऱ्या पत्रकारावर हल्ला करणे या घटनांमुळे पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संजय बांबळे यांना निवेदन देत तातडीच्या कार वाईची मागणी केली.

- घडलेलं असे की, पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी PSI गा यतड यांच्यात झालेल्या वादानंतर दिव्यांग पत्रकार किशो र गादेकर यांनी चौकशी करण्यासाठी गायतड यांची भेट घेतली.

- त्यावेळी गायतड यांनी गादेकर यांना शिवीगाळ करत “तो एक लंगड्या आहे… त्याचा दुसरा पायही तोडेल,” अशी धमकी दिली.

- याच वेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावरही गायतड यांनी शर्ट काढून अचानक हल्ला केला.

- या संपूर्ण प्रकारामुळे साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, साक्री प्रेस क्लब, जन ग्रामीण पत्रकार संघ आणि इतर प त्रकार संघटनांनी एकत्र येत निवेदन सादर केले.

- पत्रकारांनी गायतड यांच्या कृत्याला “कायद्याच्या नावाखा ली दादागिरी” असे संबोधत पुढील मागण्या केल्या—
- १)PSI महेश गायतड यांच्यावर तातडीने कायदेशीर कार वाई करावी
- २)त्यांना त्वरित निलंबित करावे
- ३)धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेची दखल घ्यावी.
- पत्रकार संघटनांनी इशारा दिला आहे की, जर वेळेत कार वाई झाली नाही तर साक्री शहरात मोर्चा, शहर बंद आणि उपोषणाचे तीव्र आंदोलन छेडले जाईल.

- निवेदन देताना प्रा.नरेंद्र तोरवणे, विजय भोसले, आबासाहे ब सोनवणे, धीरज देसले, जयेश बावा, संजय पाटील, जी. टी.मोहिते, प्रकाश वाघ,जगदीश शिंदे यांसह अनेक पत्रका र, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











