
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप उपक्रम.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :-देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शर दचंद्र पवार पक्षातर्फे साक्री उपजिल्हा रुग्णालयात रुग्णां ना फळवाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
- जनसेवा आणि समाजभान जपण्याच्या उद्देशाने आयोजि त करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

- रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या औचित्याने करण्या त आलेल्या या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
- पक्ष पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

- या उपक्रमास धुळे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र मराठे, प्रदेश उपाध्यक्ष (किसान सेल) श्री सयाजीराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री हर्षल ठाकरे, तालुकाध्यक्ष श्री गिरीश नेरक र, युवक तालुकाध्यक्ष श्री कल्पेश सोनवणे, तालुका उपा ध्यक्ष श्री रवी तोरवणे, मिलिंद पाटील तसेच पक्षाचे विवि ध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- खा. शरद पवार यांच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मकता निर्माण करता त, असा संदेश यावेळी देण्यात आला.

- सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकां कडून सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











