
वनगुळे ग्रामविकास मंडळ मुंबई तर्फे श्री नवला देवी मंदिर जिर्णोद्धार निधीसाठी “रंग कलेचा.गंध मराठी मातीचा” कार्यक्रमाचे आयोजन.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- वनगुळे ग्रामविकास मंडळ, मुंबई पुरस्कृत वनश्री कला मंच प्रस्तुत “रंग कलेचा गंध मराठी मातीचा” हा भव्य आणि ग्रामीण प्रेक्षकांच्या मनपसंतीचा कार्यक्रम मुंबईत प्रथमच रविवार दि २१ डि सेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वा. यशवंतराव नाट्यगृह माटुंगा मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
- गावातील होतकरू, हुन्नरी कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून स्वयंभू श्री सत्येश्वर मंदिर तृतीय वर्धापनच्या दिव शी कार्यक्रम करण्याची संधी हुन्नरी कलाकारांना मंडळाने उपलब्ध करून दिली गेली.

- या संधीचं युवक-युवतीनी सोनं केलं, कार्यक्रम अफलातून झाला, मुलांनी केलेला अभिनय पाहून हुन्नरी कलाकारांना मुंबईसारख्या शहरामध्ये संधी मिळवून देण्याचा मंडळाने प्रयत्न केला आहे.
- सदर कार्यक्रमाचा निधी गावातील श्री नवला देवी मंदिर जिर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गावातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान मान्य वरांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात येणार आहे.
- जेणेकरून त्यांचा आदर्श पुढील पिढी घेईल, तसेच गावा तील धावपळीच्या जीवनात विखुरलेली मंडळी एकत्र येती ल, हितगुज करतील, आणि त्यातून मंडळाची आर्थिक बा जूही भक्कम होईल आशा अनेक उद्धेशाने हा भव्य कार्य क्रम आयोजित केला गेला आहे.
- सदर कार्यक्रमाला न चुकता, न विसरता आपलया कुटुंबा साहीत उपस्थित रहावे अधिक माहितीसाठी विजय गुरव ९९२००१८०१४, चंद्रकांत पालकर ७०४५०५०८८८, नंद कुमार गुरव ९२२१३८०७३७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन वनगुळे ग्रामविकास मंडळ, मुंबई तर्फे करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











