
बावची विद्यालयातील विद्यार्थ्यांची परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट व स्वच्छता करण्यात आले.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-बावची येथील विद्या लयातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच ऐतिहासिक परंडा कि ल्ल्यास शैक्षणिक भेट दिली.
- विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता.

- या भेटीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याची स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले.
- विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासाबाबत माहिती घेतली.
- यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी उत्सुकता तसेच आपल्या वैभवशाली वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.
- या शैक्षणिक भेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी किल्ला परि सरात स्वच्छता मोहीम राबवली. प्लास्टिक कचरा, कागद व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
- सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा संदेश विद्यार्थ्यां नी यावेळी दिला. या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.
- अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्या वरण संवर्धनाची भावना तसेच इतिहासा विषयी आदर नि र्माण होतो, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











