
संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम न साजरे करणाऱ्यांवर होणार कारवाई; कृती आराखड्यानुसार संविधान महोत्सव साजरा करण्याचे उपविभागीय अधिकारी डोंगरे यांचे निर्देश.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- नॅशनल दलित मुव्ह मेंट फॉर जस्टिस संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्य क्ष अजिनाथ राऊत यांनी दि. १२/१२/२०२५ रोजी उपवि भागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे यांची भेट घेऊन शासना च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णया नु सार संविधान अमृत महोत्सव व घर घर संविधान महोत्स व साजरा करण्याची मागणी करुन याकडे दुर्लक्ष करुन पालन न करणाऱ्या संबंधित सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

- उपविभागीय अधिकारी श्री डोंगरे यांनी सदर निवेदनाची दखल घेऊन भुम व परंडा तालुक्याचे तहसिलदार, मुख्या धिकारी नगर परीषद, गटविकास अधिकारी, गटशिक्षणा धिकारी यांना सामासु विभागाच्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासननिर्णयानुसार व एन डी एम जे संघटनेने तयार करुन दिलेल्या कृती आराखड्यानुसार तसेच सहा य्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी धाराशिव यांनी दि. २५/११/२०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार संविधान अमृत महोत्सव व घर घर संविधान महोत्सव कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
- तसेच केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल उपविभागीय अधि कारी कार्यालयास व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
- चौकट.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. १८/ ११/२०२५ च्या शासन निर्णयानुसार व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव यांनी दि. २५/११/२०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार तसेच एन डी एम जे संघटणेने बन वून दिलेल्या कृती आराखड्यानुसार संविधान अमृत महो त्सव व घर घर संविधान महोत्सव कार्यक्रम साजरा न क रणाऱ्या सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचा री यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबित करण्यासाठी आम्ही संघटणेच्या वतीने पाठपुरावा करणार आहोत.
- अजिनाथ राऊत (जिल्हाध्यक्ष धाराशिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य)
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











