
युवा ग्रामविकास मंडळ सोगमवाडी (मुंबई) आयोजित दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा व स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- युवा ग्रामविकास मंड ळ सोगमवाडी (मुंबई), मु. सोगमवाडी पो.देवाचे गोठणे ता.राजापूर जि.रत्नागिरी हे मंडळ गेली अनेक वर्षे शैक्षणि क, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात अनेक उप क्रम राबवित आहे.
- आजच्या या धावपळीच्या जीवनात,आपले गाव आणि घरापासून दूर येऊन मुंबईतील या गर्दीमधे स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आलेल्या आपल्या गावातील ग्रामस्थ,महीला,मुले यांना एकत्र आणण्यासाठी तसेच त्यां ना एक दिवस का होईना वाडीतील आपल्या सर्व माणसां ना भेटून, गप्पा मारत आपल्या वाडीत आल्याचा आनंद व स्नेहबंध दृढ होईल या प्रमुख उद्देशाने गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही दिनदर्शिका – २०२६ प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला स्नेहमेळावा रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी हेमाली हॉल, नालासोपा रा (प) येथे खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत उत्साहाने पार पडला.

- सदर कार्यक्रमाला देवाचे गोठणे, बुरंबेवाडीचे सुपुत्र, हिंदु हृदसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक श्री.तुळशीदास नवाळे , सोगमवाडीतील एक ज्येष्ठ व्यक्ति मत्त्व, एक हुरहुन्नरी कलाकार श्री.बबन काका नारकर, त सेच जैतापूर (हूर्से) गावचे समाजसेवक श्री.विश्वनाथ धुरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे मंडळातर्फे आभार मानण्यात आले.
- सदर कार्यक्रमाची सुरुवात देवाचे गोठणे गावप्रमुख व सो गमवाडीचे वाडीप्रमुख श्री.विकास शांताराम सोगम तसेच सौ.वृषाली विकास सोगम, तसेच श्री.बबन नारकर, श्री. तुळशीदास नवाळे मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ सोगम व उपाध्यक्ष श्री.सुहास सोगम व श्री. राजेश सोडये यांच्या शुभहस्ते दीपप्रजवलनाने व छत्रपती शिवाजी महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
- आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना व कार्यक्रमाचे उद्दिष्ट, मंडळाची स्थापनेपासूनची वाटचाल व यापुढील मंडळाचे उपक्रम यावर मंडळाचे सचिव श्री. योगेश दिलीप सोगम यांनी मार्गदर्शन केले.
- दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन सोगमवाडीतील सर्व महि ला व गावप्रमुख श्री. विकास सोगम, मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ सोगम तसेच श्री.बबन काका नारकर व श्री. तु ळशीदास नवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
- सदर कार्यक्रमामध्ये महिलांचा हळदीकुंकू समारंभ, लहान मुले आणि महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ व सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
- या कार्यक्रमामध्ये श्री.बबनकाका नारकर, श्री.तुळशीदास नवाळे, श्री.विश्वनाथ धुरी, सौ.आरती घरत, गावप्रमुख श्री. विकास शांताराम सोगम, सौ.वृषाली विकास सोगम तसेच सोगम वाडीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्री.दिलीप शांताराम सोगम , श्री.सुरेश रामकृष्ण सोगम, श्री.संजय वासुदेव सो गम व मंडळाचे अध्यक्ष श्री.विश्वनाथ नारायण सोगम यां नी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
- या कार्यक्रमामध्ये जवळ जवळ ३५० च्या वरती सोगमवा डीतील मुंबईस्थित ग्रामस्थांनी संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.सुरेंद्र चंद्रकांत सोगम व श्री.दिलीप वसंत सोगम यांनी केले.
- हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी सहका र्य केले तसेच दिनदर्शिका-२०२६ साठी जाहिराती देऊन ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मंडळाच्या वतीने आ भार मानण्यात आले.

- सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदा धिकारी श्री. सचिन सोगम, श्री.महेश नाडणकर,श्री.नितेश सोगम, श्री.प्रविण सोगम, श्री.महेश सोगम,श्री. हर्षद सोग म, श्री.शैलेश सोगम,कु. स्वप्निल सोगम आणि इतर सर्व कार्यकर्ते तसेच श्री आई जोगेश्वरी क्रिकेट संघ, सोगमवा डी व वाडीतील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- स्नेहमेळाव्यामध्ये घेण्यात आलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमा मधील सहभागी व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवि ण्यात आले. समारंभाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











