कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरच्या दिनदर्शिका २०२६ चे थाटामाटात प्रकाशन संपन्न.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कुणबी समाजोन्नती सं घ मुंबई शाखा तालुका राजापूरच्या दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन सोहळा मंगळवार दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायं ६.३० वा. कुणबी ज्ञातीगृह, संघ मुख्यकार्यालय वाघे हॉल परेल मुंबई येथे शाखा अध्यक्ष श्री शिवाजी तेरवणक र यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघाचे सरचिटणीस श्री कृ ष्णा वणे, संघ खजिनदार श्री महेश शिर्के, ओबीसी जनमो र्चाचे कार्याध्यक्ष श्री चंद्रकांतजी बावकर यांच्या हस्ते व इ तर मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उ त्साहात पार पडला.
  • यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी तसेच रा जापूर सन्मित्र पत संस्थेचे अध्यक्ष मधुकर तोरस्कर, शिक्ष ण संस्थेचे सचिव प्रभाकर वारिक, संघप्रतिनिधी मंडळाचे नव्याने निवड करण्यात आलेले श्री चंद्रकांत लिगम, पतसं स्थेचे माजी अध्यक्ष रत्नाकर रायकर, दीपक इंगळे,शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तुकाराम मोंडे, युवक मंड ळाचे अध्यक्ष वैभव वालम, विवाह सल्लागार मंडळ उपा ध्यक्ष प्रभाकर मांडवकर तसेच शाखेचे व युवक मंडळाचे पदाधिकारी, राजापूर पत संस्थेचे संचालक बहुसंख्य समा ज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • मार्गदर्शनपर भाषणांनंतर दिनदर्शिकेचे औपचारिक प्रका शन करण्यात आले.
  • यावेळी प्रमुख मान्यवर संघाचे सरचिटणीस श्री कृष्णाजी वणे ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष श्री.बावकरजी यांनी रा जापूर शाखेच्या सामाजिक उपक्रमातील बहुमूल्य योगदा नाबद्दल भरभरून कौतुक केले व दिनदर्शिका प्रकाशना च्या शुभेच्छा दिल्या.
  • शाखा अध्यक्ष श्री.शिवाजी तेरवणकर यांनी आपले मनोग त व्यक्त करताना शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
  • गेल्या वर्ष भरात शाखेने हाती घेतलेल्या उपक्रमात विशेष तः कुणबी एल्गार मोर्चा, संघ संस्थापक माळी गुरुजी पुत ळा उभारणी तसेच ओबीसी आरक्षण निधी संकलन अशा विविध उपक्रमात आपण सर्वानी हरारींनी सहभाग घेऊन ते यशस्वीपणे पार पाडलेत त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
  • यावेळी शाखा सचिव श्री अनिल भोवड यांनी आपले मनो गत व्यक्त करताना शाखेची आर्थिकस्थिती मजबूत कर ण्याकरता तसेच सध्या सुरु असलेल्या ओबीसी – कुणबी आरक्षण बचाव याकरता न्यायालयात सुरु असलेल्या न्या यालयीन लढ्या करता लागणार निधी उभारणीकरता स माजात प्रचार व प्रसार करण्याकरता शाखा व युवक मंड ळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून.
  • त्यापैकीच हा देखील एक महत्वपूर्ण उपक्रम आपण यश स्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे व प्रामु ख्यांचे याकरता जाहिरात देऊन सहकार्य करणाऱ्या सर्व जाहिरात दारांचे, राजापूर सन्मित्र पत संस्था, शिक्षण प्रसा रक मंडळ, युवक मंडळ, ग्रामीण समिती, कुणबी पत सं स्था गाव तसेच वाडी मंडळे या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
  • तर याकामी दिनदर्शिका समितीने महत्वाची भूमिका बजा वली असून यासाठी विशेष योगदान दिलेले व ज्यांची नुक तीच शाखेच्या खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आलेले श्री.जयवंत नाचणेकर तसेच पत संस्थेचे तज्ञ् संचालक श्री.मनोहर गोरिवले, शाखेचे सहसचिव देवेंद्र पेटावे, विवा ह मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर तसेच पत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रभाकर वारिक, व्यवस्था पक श्री मनोज पुजारी, प्रिंटर सकपाळ, दीपक मोंडे, युव क मंडळाचे मनोहर नाडणकर, महेश गोंडाळ, सह सचिव संतोष जोगळे, परशुराम परवडे, रुपेश चौगुले, योगेश मास ये यांचे देखील खास कौतुक केले.
  • यावेळी ज्यांनी ज्यांनी जाहिराती देऊन शाखेला आर्थिक सहकार्य करून उपकृत केले त्या सर्वांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करून आभार व्यक्त केले.
  • आजच्या सुवर्णक्षणी शाखेचे उपाध्यक्ष संजय वारिक तसे च विवाह सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर यांचा ५० वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
  • सामाजिक कामात स्वतः ला वाहवून घेतलेल्या या समाज सेवाकांना उपस्थित सर्वांनीच वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
  • शेवटी दिनदर्शिका समितीच्या वतीने श्री जयवंत नाचणेक र यांनी सर्व उपस्थित मान्यवर, समाज बांधव जाहिरात दार यांचे आभार व्यक्त करून प्रकाशन सोहळा संपल्याचे जाहीर केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles