
मॉडर्न हायस्कुलमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन – महेश बनसोडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी)
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-सर्व पालक मोठ्या विश्वा साने आपल्या मुलांना शाळेत पाठवीत असतात. त्यामुळे मुलां-मुलींनी तक्रार पेटीत केलेल्या तक्रारीकडे शाळा प्रशा सनाने वेळीच गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

- विशेषतः मुलींच्या तक्रारी शाळास्तरावर न सुटल्यास पो लीस प्रशासनाची मदत घ्यावी असे मत निगडी पोलीस स्टे शनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी व्यक्त केले.

- मॉडर्न हायस्कुल येथे ‘विद्यार्थी सुरक्षितता’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा चार्या शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
- ते म्हणाले,विद्यार्थी सध्या शालेय विद्यार्थ्यांवर लैंगिक अ त्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे.

- यामुळे शालेय स्तरावर काही उपाययोजना कटाक्षाने करा व्यात असे त्यांनी सुचवले.यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,बस चालक,त्यांचे मदतणीस तसेच सुरक्षा रक्षक यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

- त्याचप्रमाणे शालेय परिसरात तसेच बसमध्ये देखील सी. सी कॅमेरे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. शालेय बस ची सर्व कागदपत्र त्यामध्ये आरसी बुक,इन्शुरन्स, फिटनेस सर्टिफिकेट,वाहनचालक परवाना अशा कागदपत्राची नोंद शाळेने ठेवावी.
- यावेळी विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची आणि सु विधांची माहिती नवेश पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यां ना दिली.

- यावेळी अल्फा टाईम्सचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिवहन वि भाग प्रमुख शिवाजी अंबिके यांनी तर आभार पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी मानले.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह निवेदिता एकबोटे,शाळा स मिती अध्यक्ष मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,राजी व कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










