तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले दिव्यांगांचे उपोषण दिव्यांग उद्योग समूहाच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील मौजे ढगपिंपरी ता.परंडा येथील दिव्यांग विजय विठ्ठल हा वळे हे दिनांक 23/11/ 2025 रोजी तहसील कारल्या समोर आमरण उपोषणाला बसले असता त्यांच्या प्रकरणा चे दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांनी शहानिशा करून माहिती घेऊन प्रशासकीय अधिका री यांच्याशी संवाद साधून उपोषण तात्पुरते स्थगित कर ण्याचा उपोषणकर्त्या समवेत चर्चा करून निर्णय घेतला.
  • ढगपिपरी येथे राहते घर जागेवर केलेले अतिक्रमण का ढावे अशी मागणी अर्जदार विठ्ठल हावळे हे वारंवार करत आले.
  • परंतु यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागले या संदर्भात प्रशा सन अधिकारी नायब तहसीलदार विजय बाडकर यांच्या दालनामध्ये या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
  • यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी अजय माळी दिव्यांग संघटना अध्यक्ष तानाजी घोडके पत्रकार फारुक शेख विजय मेहर यांच्या समवेत चर्चा करण्यात आले.
  • तहसीलदार यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी पंचा यत समिती व ग्रामसेवक सरपंच यांना सदर चौकाची साथ अहवाल सादर करून निर्णय घेऊ असे लेखी घेऊन सदरील उपोषण पाणी पाजून स्थगित करण्यात आले.
  • यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी घो डके दिव्यांग उद्योग समूहाचे तालुकाध्यक्ष तानाजी सांगडे, उपाध्यक्ष अशोक भराटे समाजसेवक कानू सरपणे, गणेश जाधव,पत्रकार फारुख शेख सरपंच बप्पा काळे,ग्रामविका स अधिकारी प्रचाडे यांच्या उपस्थितीमध्ये लेखी आश्वास नानंतर सदरील उपोषण दिव्यांग उद्योग समूहाच्या मध्य स्तीने उपोषण यांना घेतले.
  • चौकट:सदरील प्रकरणाचा ग्रामपंचायत ग्रामविकास अधि कारी सरपंच व संबंधित अधिकारी यांनी दहा ते पंधरा दि वसांमध्ये लेखी पुरावा दिव्यांग हावळे व दिव्यांग संघटना यांना देण्यात येईल असे लेखी पत्रात सांगण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles