कुणबी सेनेची विलेपार्ले येथे आज तातडीची बैठक.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- दि.१५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे.
  • महाराष्ट्रातील कुणबी समाज व कष्टकरी वर्ग मोठ्या संख्ये ने या महानगरीत नोकरी धंद्याच्या निमित्ताने वास्तव्य करू न आहे.
  • परंतु आजवरच्या राजवटीने मोठ्या संख्येने असलेल्या या समाजाला न्याय न दिल्यामुळे त्याला मुंबईतून हद्दपार व्हावे लागत आहे.
  • गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीत कुणबीसेना प्रमुखांनी जा तीपातीच्या भिंती तोडून सामाजिक न्यायापासून वंचित अ सलेल्या मुंबई,नवी मुंबई , ठाणे व लगतच्या महानगरपालि का क्षेत्रामध्ये जोरकस आंदोलने उभी करुन कष्टकरी, कामगार व वंचित वर्गाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • येणारी निवडणूक समाजाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने निर्णाय क असून पुढील रणनीती आखण्यासाठी मंगळवार दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी सायं ७ वा. कुंकूवाडी एस,आर,ए बि ल्डिंग, मारुती मंदिर जवळ,पीएम रोड, विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे.
  • सदर‌ सभेला कुणबी सेनाप्रमुख सन्मा श्री.विश्वनाथजी पा टील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
  • या सभेला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा वे असे आवाहन संघटक कोकण विभाग कुणबी सेना श्री राजाभाऊ कातकर, सरचिटणीस कुणबी सेना डॉ विवेक पाटील, मुंबई अध्यक्ष श्री प्रकाश बारे, विलेपार्ले विभाग – श्री चंद्रकांत म्हादे, श्री विष्णू रेवाळे, सांताक्रूझ विभाग – श्री महादेव गोताड, श्री निलेश गोरिवले, वडाळा विभाग – श्री दत्ताराम बंडबे यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles