
मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर यमुनानगर निगडी चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे पार पडला.
- यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी कुंडलि क कारकर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान शाळा समिती चे अध्यक्ष मानसिंग साळुंके यांनी भुषविले.

- कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविकात पांडुरंग मराडे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाची माहि ती दिली.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता कुलकर्णी यांनी केले. प्र मुख पाहुण्यांचा परिचय किरण वारके यांनी करून दिला.
- यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव कर ण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन माया सूर्यवंशी यांनी केले.

- विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात एकूण 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्रीगणेश वंदना, कोळी गी त, देशभक्ती नृत्य, संभाजी महाराजांची शौर्यगाथा इ.दर्जे दार कार्यक्रमांचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनं द लुटला.
- यासर्व नृत्यांमधून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले ल्या संभाजी महाराजांची शौर्यगाथा या नृत्याचा प्रथम क्रमांक आला.

- नृत्याला मार्गदर्शन करणारे कैलास माळी यांचा स्मृतिचि न्ह देऊन सन्मान करण्यात आला. सर्व गाण्यांचे निवेदन अपर्णा घोलप यांनी केले.
- कार्यक्रमासाठी व्यासपीठावर व्हिजीटर प्रमोद शिंदे, प्रसि द्ध लेखक तुषार कुटे,शारदा साबळे,विजय पाचारणे, संगी ता घुले,समृध्दी प्रतिष्ठान पिंपळे गुरव च्या अध्यक्षा राणी पवार, शारदा हागे,सुप्रिया पवार,पूनम वाघ,विद्यार्थी प्रति निधी ज्ञानेश्वरी कुटे इ. मान्यवर उपस्थित होते.

- संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे व कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभे च्छा दिल्या.कैलास माळी यांनी आलेल्या सर्व अतिथिंचे आभार मानले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











