
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सोनारी ग्रामस्थ आक्रमक; ६ जानेवारीपासून बेमुदत ‘रस्ता रोको’चा इशारा.
- प्रतिनिधी : फारूक शेख :-परंडा-पाथरूड राज्य महामा र्ग क्रमांक २१० ची अत्यंत दुरवस्था झाली असून, वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्ल क्ष करत आहे.
- या उदासीनतेच्या निषेधार्थ आणि रस्ता दुरुस्तीच्या माग णीसाठी सोनारी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
- येत्या ६ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बे मुदत ‘रस्ता रोको’ करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वती ने देण्यात आला आहे.
- प्रशासनाने येत्या ५ दिवसांत (६ जानेवारीपर्यंत) या निवेद नाची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्य था, समस्त सोनारी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
- यादरम्यान होणाऱ्या परिणामांना पूर्णतः सार्वजनिक बांध काम विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

- निवेदन देताना रवी मांडवे, सचिन पवार, अविनाश हांगे, गणेश फले हे उपस्थित होते.
- या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अ धीक्षक धाराशिव, तहसीलदार परंडा आणि आंबी पोलीस स्टेशन यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.
- मौजे सोनारी येथील शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि धोकादायक झाली आहे.
- सोनारी हे ठिकाण श्री काळ भैरवनाथ तीर्थक्षेत्र असल्याने येथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून भाविकांची मोठी वर्द ळ असते.

- मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाले असून अनेकां ना आपले प्राण गमवावे लागले आहे.
- ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित वि भागाला वारंवार प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे माहिती दे ऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
- सद्यस्थितीत ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने साखर कारखान्यांची अवजड वाहने याच मार्गावरून धावतात.
- हा मार्ग अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख दुवा असूनही प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
- प्रशासनाला जागे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम वि भाग परंडा येथे १ जानेवारी २०२६ रोजी हे निवेदन देण्या त आले.

- “जर या धोकादायक रस्त्यामुळे भविष्यात कोणताही अप घात झाला, तर त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबा बदार असेल आणि संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गु न्हा दाखल करण्यात येईल,” असा आक्रमक पवित्रा ग्राम पंचायतीने घेतला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











