डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी दिनेश मडके यांची पुनश्च निवड.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- महाराष्ट्र डि जिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या करमाळा ता लुका अध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे.
  • संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य राजा माने यांच्या ने तृत्वाखाली गेल्या पाच ते सात वर्षांच्या कालावधीत दिने श मडके यांनी करमाळा तालुक्यात संघटनात्मक बांधणी करत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासा ठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
  • त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
  • ही निवड पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार प डलेल्या संघटनेच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
  • बैठकीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेश उ पाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवि ण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण,कोषाध्यक्ष अमित इंगोले यांच्या सह गणेश शिंदे, शशांक शिंगाडे, धीरज शेळके, माढा ता लुका अध्यक्ष विजय चव्हाण, अंकुश आतकर तसेच जि ल्हा, तालुका व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
  • यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनेश मडके यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
  • त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा गौरव करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
  • महाराष्ट्र डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासनमान्यता दिली असून, यासंदर्भातील प्रक्रिया केंद्र व राज्य शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
  • डिजिटल मीडिया पत्रकारितेला अधिकृत अधिमान्यता मि ळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले ले प्रयत्न महत्त्वाचे असून, त्यांच्या दूरदृष्टीतूनच डिजिटल पत्रकारांच्या न्यायाचा मार्ग अधिक सक्षम झाला असल्या चे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
  • प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डि जिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत पत्रकारांना शासकीय सो यी-सवलती, संरक्षण व अधिकृत मान्यता मिळवून देण्या साठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
  • पत्रकारांच्या हक्कांसाठी व सुरक्षिततेसाठी संघटना कटि बद्ध राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
  • पुनश्च निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना तालुकाध्यक्ष दिनेश मडके म्हणाले, “प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियाला ही शासनाच्या जाहिराती, अधिस्वीकृती व अधिकृत मान्य ता मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील.
  • पत्रकार सुरक्षा विमा, कुटुंब कल्याण योजना, पेन्शन यांस ह विविध शासकीय योजनांचा लाभ डिजिटल पत्रकारांना मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल.”
  • ते पुढे म्हणाले की, पत्रकारांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्र तिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत के ली असून,पत्रकार कुटुंबांसाठी दहा लाख रुपयांच्या विम्या ची तरतूद करण्यात आली आहे.
  • डिजिटल मीडिया पत्रकारांची अधिकृत नोंदणी करून त्यां चे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी संघट ना कार्यरत राहणार असून, आगामी काळात प्रशिक्षण का र्यशाळा, मेळावे व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
  • तसेच लवकरच करमाळा तालुक्याची कार्यकारिणी जाही र करण्यात येईल, अशी माहिती तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles