श्री.क्षेत्र टेरव येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- रूढी-परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरा त घटस्थापना व विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताहाचा आनंद सोहळा नुकताच संपन्न झाला.
  • वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार मंगलमय काकड आर ती, संध्याकाळी हरिपाठ व त्या नंतर नामांकित किर्तनकार ह.भ.प.सर्वश्री प्रमोद राणे, सतीश सकपाळ, सतीश सावं त, अरुण पिदनकर, नारायण पवार, संजय साळवी, आणि अरुण जाधव महाराज यांच्या श्रवणीय कीर्तनांचे आयोज न करण्यात आले होते.
  • मृदुंग व भजनाची लयबद्ध साथ श्री रोशन चव्हाण व धर करी श्री राम साळवी व श्री पराग जाधव यांनी दिली.  तसेच रात्रौ हरी जागर करण्यात आला.
  • सतत सात दिवस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हरिनाम सप्ताहच्या या कार्यक्रमात समस्त ग्राम स्थ- भाविकानी आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली.
  • सप्ताहाची सांगता ह.भ. प. श्री भागवत भारती महाराज आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.
  • त्यानंतर हंडी फोडून काला करण्यात आला व घट हालवू न विधीवत पूजा करून वीणा उतरविण्यात आला.
  • ग्रामस्थ बंधू भगिनींनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा गजर करून परिसर मंगलमय केला.
  • सप्ताह समाप्तीचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर भंडाऱ्या चे आयोजन करण्यात आले.
  • अखंड हरिनाम सप्ताहात जात – पात, गरीब – श्रीमंत अ सा भेदभाव न करता फक्त आणि फक्त भक्तिभाव जपला जातो आणि हाच भक्तीभाव प्रत्येकाला जगण्यासाठी ऊ र्जा देतो, त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन क रून समाजप्रबोधन होणे ही काळजी गरज आहे असे मत मान्यवर कीर्तनकारानी मांडले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles