सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडविली – प्राध्यापिका सुचित्रा जाधव.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- परंडा दि. 3 जानेवा री २०२६ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्माज्यो तिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली आणि भारतातील सर्व स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला.
  • विधवा पुनर्विवाह व बालविवाह सारख्या कुप्रथाविरुद्ध आवाज उठविला असे मत मुरुड येथील डाइटच्या प्राध्या पिका सुचित्रा जाधव यांनी व्यक्त केले.
  • त्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयात उपस्थित होत्या.
  • श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती उत्सा हात साजरी करण्यात आली.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राध्यापि का सौ परवीन मोरवे तर प्रमुख उपस्थिती म्हणून महावि द्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुरुड येथील डाएटच्या अधिव्याख्याता सुचित्रा जाधव आणि धाराशिव येथील डा एटचे अधिव्याख्याता प्रा बिराप्पा शिंदे यांची प्रमुख उप स्थिती होती.
  • व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुनील जाधव कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीम ती पद्मा शिंदे सौ नागरे मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्र माची प्रस्तावना प्रा अनिसा शेख यांनी केले.
  • यावेळी प्रज्ञा सोनवणे संध्या पाटील साक्षी पाटील अमृता ठोंगे विशाखा लोकरे आरती मुळे अमृता नालगे श्रीदेवी शिंदे निकिता ठोसर आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा माने यांनी केले. सावित्रीबाई फुले व कै. रा गे शिंदे गुरुजी यांच्या प्र तिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते हस्ते करण्यात आले.
  • स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राध्यापिका सुचित्रा जाधव आणि प्राध्यापक बीरप्पा शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान दिले.
  • याप्रसंगी डॉ.सौ.निलोफर चौधरी यांनी क्रांती ज्योती सावि त्रीबाई फुले आणि जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित काव्य वाचन केले. जिजाऊ सावित्री संवाद सहवास ही नाटिका दिव्या थोरात आणि दिव्या निंबाळकर यांनी सा दर केली.
  • यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनींच्या युवती मंचची स्थापना करण्यात आली व माता पालक संघही स्थापन करण्यात आला.
  • कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रा सौ परवीन मोरवे यांनी केला. तर प्राध्यापिका सातव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
  • कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्र माचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते.
  • याप्रसंगी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles