
दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत कोंढेतडच्या युवराज मंदार पेणकर याची निवड.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र राज्य ३५ वी क्युरोगी आणि ११वी पुमसे सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा सन २०२५-२६ वासुदेव हॉल उद्यमनगर, बिहाइंड आर एस एन हॉटेल मुंबई गोवा हायवे कुडाळ जि ल्हा सिंधुदुर्ग दि . २६ ते२८ डिसेंबर रोजी पार पडली या स्पर्धेसाठी सुमारे ४०० खेळाडूंनी सहभागी झाले होते.
- वरील स्पर्धेत तायक्वांदो ॲकॅडमी राजापूरचे ६ खेळाडूंनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्त्व करत यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.

- यामध्ये कोंढेतडचे सुपुत्र कु. युवराज मंदार पेणकर यांने २५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची दि ल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
- कु.द्रोण संदीप चव्हाण यांने ३२ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले, कु.यज्ञेश जगदीश पेणकर यांने २३ कि लो वजनी गटात कांस्यपदक पटकावले, कु.श्वेत मुकेश नाचरे यांने २१ किलो वजनी गटात तर, कु. वेदांत नरेश रहाटे यांने २७ किलो वजनी गटात आपला सहभाग नोंदव ला, कु. मिताली मोहन घुमे हिने ४७ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले.
- तसेच रत्नागिरी जिल्ह्याने क्युरोगी प्रकारात तृतीय क्रमां काचा तर पूमसे प्रकारात प्रथम क्रमांकाचा चषक पटका वला. कु.श्रृतिका मांडवकर व कु.अंश गुंड्ये यांनी राज्य स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावली.
- वरील ६ खेळाडू शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धर्मशाळा मारुती मंदिर जवळ तायक्वांदो ॲकॅडमी राजा पूर या प्रशिक्षण केंद्रान प्रशिक्षण घेत आहेत.
- या खेळाडूंना राजापूर तालुका प्रमुख प्रशिक्षक श्री मुकेश शांताराम नाचरे त्याच बरोबर सौ. मधुरा नाचरे कु श्रृतिका मांडवकर, कु. अंश गुंड्ये ,कु. गौरव धालवलकर हे मार्गद र्शन करत आहेत.
- खेळाडूंच्या या यशाबद्दल तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष श्री.अभिजित जनार्दन तेली उपाध्यक्ष श्री. मुकेश मयेकर खजिनदार श्री.संजय मांडवकर सदस्य श्री दिपक धालवलकर श्री.संदीप राऊत श्री.प्रसाद शिवलकर सौ. मा नसी दिवटे सौ दीपिका पवार श्री अद्वैत अभ्यंकर श्री निले श रहाटे यांनी सुद्धा सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
- या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपा ध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुली छंद मेश्राम, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खे मसकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, वि श्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, यांना विशेष शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











