
मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा.
- प्रतिनीधी : चुनाकोळवण : प्रमोद तरळ :- राजापूर ता लुक्यातील मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन १५ मे २०२६ रोजी “चुनाकोळवण महो त्सव” मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी थाटा माटात साजरा करण्यात आला.
- या महोत्सवाचे उद्घाटन राजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्ष क श्री अमित यादव यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाच्या ध्वज वंदनाने करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रतीक मटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- या महोत्सवात ‘एक धाव एकीसाठी’ असा संदेश देणाऱ्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

- विविध तीन गटांमध्ये करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जि ल्ह्यातील ७२ स्पर्धकांनी भाग घेतला.
- या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय मुलांच्या खुल्या गटांमध्ये प्रथ म क्रमांक कुमार महेंद्र दत्तराम कुडकर (शिरवली) द्वितीय क्रमांक कुमार निलेश नंदकिशोर कुळये (वेरवली) व तृती य क्रमांक अथर्व मिलिंद माजळकर( झापडे) लांजा तसेच मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक स्वरा संजय उपशेट्ये( लां जा) द्वितीय क्रमांक कुमार प्राप्ती अनंत तरळ (कळसव ली) व तृतीय क्रमांक स्वरा रवींद्र गाडे (चुनाकोळवण) या स्पर्धकांनी जिंकण्याचा मान मिळवला.
- महिलांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम, उत्सव स्त्रीशक्तीचा खेळ पैठणीचा यात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
- त्या स्पर्धांमध्ये आठ गावातील जवळपास४५० महिलांनी सहभाग घेतला, तसेच या कार्यक्रमात११ पैठण्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.
- वेगवेगळ्या गावातील काढण्यात आलेल्या महिलांच्या ल की ड्रॉमध्ये दीपांजली दशरथ मटकर कुमारी प्रज्ञा प्रकाश बाईत सौ साधना संदीप मटकर अशा अकरा महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले.
- नाविन्यपूर्ण झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ सं स्थेचे कार्यकर्ते श्री मंदार शिंदे यांनी आकर्षक व प्रभावीप णे केले.
- महिलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये १५ महिलांना आकर्षक आकर्षक बक्षीसे देण्यात आली, त्याचबरोबर पु रुषांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.
- सन २०२५ च्या गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांनाही बक्षीस देण्यात आली, त्यामध्ये प्रथम क्रमांक शिवराम सो यने द्वितीय क्रमांक श्री प्रकाश मांडवकर तृतीय क्रमांक केशव मटकर यांनी पटकावला होता.
- गावातील मुला मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज न करण्यात आले होते.
- यामध्ये कुमारी अपर्णा तानाजी मटकर अमिषा तानाजी म टकर कुमारी इशिका संदीप मटकर कुमारी साक्षी प्रमोद मटकर अशा १६ मुलांनी आपली कला सादरीकरण केले त्याचबरोबर कुमार राजकृष्ण उदय सावंत यांनी अभंगाचे गायन केले.
- विविधतेने नटलेल्या चुनाकोळवण महोत्सवाला प्रमुख पा हुणे म्हणून माननीय आमदार श्री किरण उर्फ भैया सामंत उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्यां स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.
- त्याचबरोबर संघटनेच्या गीताचे सादरीकरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्रतिष्ठानने चालवलेल्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- विशेषत सवतकडा याच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.
- चुनाकोळवण महोत्सवाला ओबीसी समाजाचे नेते श्री चं द्रकांत बावकर साहेब आरडीसी बँकेचे संचालक श्री महे श खामकर साहेब, विभागातील प्रगताशील शेतकरी श्री दयानंद चौगुले यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
- या कार्यक्रमाची सांगता वाघदेवी नमन नाट्य मंडळ निव ळी सावर्डे यांच्या सुंदर नमन नाट्यच्या सादरीकरणाने कर ण्यात आली. या महोत्सवाला जवळपास ७०० ते ८०० लोकांनी भेट दिली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






