धार्मिक कार्यक्रमाला तात्पुरता विराम देत कोकण नगर रहिवाशी संघाने विद्यार्थ्यांसाठी उचलले मोठे पाऊल.

  • प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- मनवेलपाडा, विरार (पूर्व) येथील कोकण नगर रहिवाशी संघ गेल्या १६ वर्षां पासून प्रती वर्षी सार्वजनिक श्री. सत्यनारायण महापूजेचे आयोजन करत असते.
  • विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असते. मात्र यावर्षी संघाने समाजहिताचा एक प्रेरणादायी निर्णय घेत धार्मिक कार्यक्रमाला तात्पुरता विराम देत शालेय विद्या र्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या निर्णयानुसार यावर्षी सार्वजनिक श्री.सत्यनारायण महा पूजे ऐवजी कोकण नगर परिसरातील गरजू शालेय विद्या र्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्या त येणार आहे.
  • शिक्षण हेच खरे ईश्वरपूजन असून विद्यार्थ्यांच्या भविष्या साठी केलेली गुंतवणूक हीच खरी समाजसेवा आहे,अशी स्पष्ट भूमिका संघाने यावेळी घेतली आहे.
  • कोकण नगर रहिवाशी संघ गेल्या अनेक वर्षांपासून धार्मि क, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समा जाशी नाळ जपत कार्यरत आहे.
  • धार्मिकते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय नागरिकांकडून विशेष स्वागतार्ह ठरत आहे.
  • संघाच्या वतीने सांगण्यात आले की, “दरवर्षी धार्मिक का र्यक्रम घेणे महत्त्वाचे असले तरी यावर्षी शालेय विद्यार्थ्यां च्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे अधिक गरजेचे वाटले.
  • एका मुलाच्या शिक्षणासाठी दिलेला हातभार हीच खरी पूजा आहे.”
  • या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस दिशा देण्यासाठी करिअर मार्गदर्शनपर प्रेरणा दायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • तसेच समाजातील महिलांसाठी सन्मान व एकोप्याचे प्रती क असलेला महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभही उ त्साहात साजरा करण्यात येणार आहे.
  • या सोहळ्यास समाजसेवक कमलाकर देवजी फिलसे यां ची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांनी शालेय विद्या र्थ्यांसाठी वह्या वाटपासाठी लाख मोलाचे सहकार्य केले आहे.
  • तसेच सत्यवान यशवंत रेडकर (वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू व सेवा कर, मुंबई – भारत सरकार) हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  • कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विनायक शिगवण (अध्यक्ष–को कण नगर रहिवाशी संघ) भूषवणार आहेत.
  • हा उपक्रम रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी. सायं काळी ३ वा. सी.जी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल, मनवेल पाडा गाव, कोकण नगर, विरार (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.
  • या कार्यक्रमाला आपल्या पाल्यासह उपस्थिती प्रार्थनिय आहे विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles