तिवरे गावच्या रहिवाशी व शिरवली शाळेतील शिक्षिका सौ. श्रध्दा संतोष दळवी यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील तिव रे दळवी वाडीतील रहिवासी व जि.प.पू प्राथमिक आदर्श शाळा शिरवली ता.लांजा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.श्रध्दा संतोष दळवी यांना राजापूर – लांजा नागरिक संघ. मुंबई या संस्थेचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्का र जाहीर झाला आहे.
  • सौ.दळवी मॅडम या १ ऑगस्ट २०१४ पासून जि.प.पू प्राथ मिक आदर्श शाळा येथे कार्यरत आहेत याआधी त्या आर गांव नं २ शाळेत १३ वर्षे व विलवडे नं १ मध्ये अध्यापन केले आहे.
  • सौ.श्रध्दा संतोष दळवी मॅडम यांचा शाळेतील विविध उप क्रमात सक्रिय सहभाग असून त्यांनी कार्यकाळात अनेक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी घडवले.
  • नासा इस्त्रो भेटीसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड तसेच मुख्यमं त्री माझी शाळा – सुंदर शाळा स्पर्धेत शिरवली शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
  • त्यांनी राबविलेल्या परसबाग उपक्रमाला तालुक्यातून स लग ३ वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांची जि.प. मार्फत अभ्यास दौऱ्यासाठीही निवड झाली आहे.
  • सौ.दळवी मॅडम यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी क्रिडा स्पर्धेत जिल्हास्तरावर मजल मारली आहे.
  • यासर्व शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने साने गुरुजी आदर्श शिक्ष क पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
  • पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि ३० जानेवारी ते रवि वार १ फेब्रुवारी या कालावधीत लांजा तालुक्यातील रिंग णे येथे होणाऱ्या ११ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलना त दि. १ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
  • उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ श्रध्दा संतोष दळवी यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सहकारी शिक्षक,शिरवली शाळा तसेच लांजा राजापूर तालुक्यातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles