अनमोल समाजकार्याच्या कौतुकाचा अविस्मरणीय सत्कार सोहळा.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- ग्रीन इंडिया इनि शिएटीव प्रा लि. या संस्थेचे संस्थापक तसेच संपूर्ण भारत भर द सोलार मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणार डॉ.सचिन धृपदा यशवंत शिगवण, संस्थेचे मुख्य कार्यका री अधिकारी सुयोग गंगावणे आणि संपूर्ण ग्रीन इंडिया इ निशिएटीव टीमचा चिपळूण तालुक्यातील पंचक्रोशीतील १६ गावांतर्फे कौतुकास्पद अविस्मरणीय सत्कार समारंभ सोहळा साकारण्यात आला.
  • या सोहळ्याचे नियोजन आबिटगाव चे आदर्श सरपंच सु हास भागडे , तसेच त्यांचे सहकारी, कळंबट गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सचिन घाणेकर त्याच बरोबर पाते -पिलवली गावचे सरपंच दिनेश पुनवत यांच्या सहविचाराने करण्यात आले.
  • चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील २० गावे ५०० हून अधिक सौर पथदिव्यांच्या माध्यमाने उजळली आहेत.
  • त्याचबरोबर शाळेसाठी सौर ऑफ ग्रीड प्रणाली आणि वि द्यार्थ्यांना ६५० सौर पथदिवे देऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रा त चांगलीच प्रगतीची दिशा दाखवली आहे.
  • अशा अनमोल आणि महान दायित्वाबद्दल कृतज्ञता दर्शव त सर्व गावांनी मिळून डॉ सचिन शिगवण सर आणि त्यां च्या संपूर्ण ग्रीन इंडिया इनिशिएटीव टीमचा कौतुकास्पद सन्मान करण्यात आला.
  • आतापर्यंत राबवत आलेल्या सौर पथदिव्यांच्या प्रकल्पा मध्ये सर्व गावांनी खूप जबाबदारीने मोलाचे श्रमदान केले.
  • त्यातील काही गावी खूपच चांगल्या पद्धतीने प्रकल्प राब विण्यासाठी अतिशय व्यवस्थित नियोजनबद्ध सहकार्य केले.
  • या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल डॉ. सचिन शिगवण सर आणि त्यांच्या संपूर्ण ग्रीन इंडिया च्या टीमने गावांना आदर्श गाव, आदर्श सरपंच आदर्श उपसरपंच, आदर्श ग्रामविकास अ धिकारी अशा विविध वर्गामध्ये सन्मान देऊन गौरविण्यात आले.
  • यामध्ये विशेषतः म्हणजे अबिटगावचे सरपंच श्री सुहास भागडे यांना पंचक्रोशीतील आदर्श सरपंच म्हणून गौरवि ण्यात आले.
  • त्याच बरोबर कळंबट गावचे सुपूत्र सचिन घाणेकर यांना एक आदर्श समाजकार्यकर्ता म्हणून गौरविण्यात आले. अ शा अनेक व्यक्तीमत्वांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • डॉ.सचिन शिगवण सरांनी त्यांच्या आणि ग्रीन इंडिया च्या केलेल्या समाजकार्याच्या सन्मानाबद्दल सर्व गावांचे आभा र व्यक्त केले आणि असे विविध प्रकल्प गावामध्ये करत राहू असे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles