
शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परांडा येथे “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मोहिम” यशस्वीपणे संपन्न.
- प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- शिक्षणमहर्षी गुरुव र्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परांडा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्ष णिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मोहिम” मोठ्या उत्साहात व प्रभावीपणे राब विण्यात आली.
- ही विशेष मोहिम दिनांक 01 जानेवारी 2026 ते 10 जा नेवारी 2026 या कालावधीत यशस्वीपणे पार पडली.

- सदर मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना राज्य शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांची सखोल माहिती देणे, तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, शंका व तांत्रिक समस्यांचे त्वरित निरसन करणे हा होता.

- अनेक वेळा माहितीअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या वतीने ही मोहिम आयोजित कर ण्यात आली.

- या मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती नोडल अधि कारी डॉ.प्रकाश सरवदे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
- त्यांनी विद्यार्थ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा, अर्ज करताना आवश्यक का गदपत्रे कोणती, पात्रता अटी काय आहेत.

- अर्जातील माहिती कशी तपासावी, तसेच अर्ज नाकारले जाण्याची कारणे व ती कशी टाळावीत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
- या कालावधीत विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत राबवि ण्यात येणाऱ्या एकूण 14 शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

- त्यामध्ये शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सहाय्य योजना, सामाजिक व आ र्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या विविध शिष्यवृ त्ती योजनांचा समावेश होता.
- प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पात्रतेनुसार शिष्यवृत्ती अर्ज भरावा, तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, असे आवाहन डॉ. प्रकाश सरवदे यांनी विद्यार्थ्यांना केले.

- यावेळी त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे प्रेरणादायी आव्हानही उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.
- या विशेष मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या वैयक्तिक अडचणी, कागदपत्रांबाबतच्या समस्या, उत्पन्न दाखला,जा त प्रमाणपत्र, बँक खाते व आधार लिंकिंग, तसेच ऑनला ईन अर्जातील तांत्रिक अडचणी यांचे तत्काळ व प्रभावी निरसन करण्यात आले.

- त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबत आ त्मविश्वास निर्माण झाला असून, अर्ज प्रक्रियेस सकारात्म क प्रतिसाद मिळाला.
- या मोहिमेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ माहेशकुमार माने डॉ.रंदील जी.एस.डॉ.खर्डेअरुण, डॉ.शहाजी चंदनशि वे, डॉ.बाळासाहेब राऊत, डॉ.निलोफर चौधरी, प्रा.हुके हे विचार मंचावर उपस्थित होते.
- त्याचबरोबर विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्म चारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- एकूणच, शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, प रांडा येथे राबविण्यात आलेली “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मो हिम” ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक व प्रेर णादायी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस आ णि आर्थिक स्थैर्यास निश्चितच हातभार लावणारी ठरली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











