
परांडा तालुक्यात भारत गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट…? सर्व्हे पावतीवरील रकमेत खाडाखोड करून जादा वसुलीचा आरोप
- प्रतिनिधी : परांडा : फारूख शेख :- परांडा तालुक्यात भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस (LPG) एजन्सीमार्फत राबवल्या जाणाऱ्या सुरक्षितता तपासणी (Safety Surv ey) मोहिमेत ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

- सर्व्हेच्या अधिकृत पावतीवर असलेल्या मूळ रक्कमेवर खाडाखोड करून ग्राहकांकडून जादा पैसे उकळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
- नेमका प्रकार काय....?
- मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीमार्फत घरोघरी जा ऊन गॅस जोडणीची तपासणी केली जात आहे. नियमानु सार या तपासणीचे ठराविक शुल्क कंपनीने निश्चित केले आहे.
- मात्र,परांडा येथील एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांना देत अस लेल्या पावतीवर मूळ किंमत खोडून त्या जागी हाताने जा स्त रक्कम लिहित असल्याचे दिसून आले आहे.
- अनेक सुज्ञ ग्राहकांनी यावर आक्षेप घेतला असता, कर्मचा ऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
- ग्राहकांमध्ये संताप
- “गॅस एजन्सीने आधीच गॅस सिलिंडरचे दर वाढलेले अस ताना, आता सर्व्हेच्या नावाखाली ही नवी लूट सुरू केली आहे.
- पावतीवर खाडाखोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून, अधिकृत रक्कमेपेक्षा ५० ते १०० रुपये जास्त घेतले जात आहेत,” अशी तक्रार एका त्रस्त ग्राहकाने केली आहे.
- प्रशासनाकडून कारवाईची मागणी
- या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरीब ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
- भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक तहसील प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित एजन्सीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परांडा शहरातील व तालुक्यातून नागरिकांकडून होत आहे.
- काय काळजी घ्यावी….?
- गॅस सर्व्हेच्या पावतीवर कंपनीची छापील किंमत तपासा.
- जर पावतीवर खाडाखोड असेल तर पैसे देण्यास नकार द्या.

- अशा प्रकारची फसवणूक होत असल्यास भारत गॅसच्या अधिकृत तक्रार निवारण पोर्टलवर किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











