
परंडा येथील कैरावसाहेब पाटिल प्राथमिक विद्यालयात बाळ आनंद मेळावा संपन्न.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा येथील कैरावसाहेब पाटिल प्राथमिक विद्यालय बाळ आनंद मेळावा घेण्यात आला.
- या मेळाव्याचे उदघाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस रिपोर्टर चे डिव्हीजन हेड बाबर मशायक यांच्या हस्ते सर स्वतीचे प्रतिमेचे पुजन करून फित कापुन करण्यात आले.

- या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक सु भाष जगताप हे होते.
- प्रारंभी प्रमुख पाहुणे पत्रकार बाबर मशायक, प्रमोद वेद पाठक, विजय मेहेर यांचा शाळेचे वतीने फेटा बांधून पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
- यावेळी या बाळ मेळाव्यात शाळेच्या विदयार्थी विदयार्थी नींनी भाजीपाला, चहा कॉफी, खेळणी, भेळपुरी, महिलां च्या बांगड्या इत्यादिचे स्टॉल लावले होते.
- यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शॉपींग करून विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले, त्यांना प्रोत्साहन दिले.

- या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक येमले, पाटील, जाधव, वड तीले, सांगडे, कोळी, सर्व शिक्षीका, मोठ्या प्रमाणात विद्या र्थी व पालक उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











