
परंडा तहसील कार्यालय प्रशासकीय कामांसाठी ‘ओस’; निवडणूक ड्युटीमुळे नागरिक वाऱ्यावर.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- सध्या परंडा तहसी ल कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निव डणूक कर्तव्यावर (Election Duty) असल्याने सर्वसामा न्य नागरिकांचे हाल होत आहेत.
- दिवसभर ताटकळत थांबूनही कामे होत नसल्याने नागरि कांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागत आहे.

- प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक का माला न लावता, टप्प्याटप्प्याने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
- नागरिकांची ससेहोलपट
- तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक विविध दाखले, एकसे सात जामीन साठी जमिनीची कामे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी परंडा तहसील कार्यालयात येत आहेत.
- मात्र, कार्यालयात गेल्यावर “अधिकारी निवडणूक ड्युटीव र आहेत” असे उत्तर त्यांना मिळत आहे.
- सकाळपासून दुपारपर्यंत थांबूनही साधे अर्ज स्वीकाराय लाही कोणी नसल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
- टप्प्याटप्प्याने ड्युटी लावण्याची मागणी
- निवडणुकीचे काम महत्त्वाचे असले तरी, दैनंदिन प्रशास कीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणे चुकीचे असल्याची भा वना नागरिक व्यक्त करत आहेत.
- सर्वच कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक कामात गुंतव ण्याऐवजी, त्यांची विभागणी करून काही कर्मचाऱ्यांना कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे.
- जेणेकरून जनतेची महत्त्वाची कामे अडकून राहणार आहेत.
- प्रशासनाने दखल घेण्याची गरज
- दूरवरून येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- किमान अत्यावश्यक कामांसाठी तरी पर्यायी व्यवस्था उप लब्ध करून द्यावी, अशी विनंती परंडा तालुक्यातील जन तेकडून केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











