
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जुवाठी विभाग संपर्क प्रमुखपदी ॲड सुभाष बाणे तर नाटे उपविभाग संपर्क प्रमुखपदी सुरेंद्र करंगुटकर.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, माजी खासदा र विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर, रत्नागिरी जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख चंद्र कांतजी नकाशे, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिलजी भोवड यांच्या शिफारशीने केळवली जि. प. विभाग नवीन जि. प. जुवाठी विभाग संपर्क प्रमुख पदी श्री.सुभाष गंगा राम बाणे व नाटे पंचायत गण उपविभाग संपर्क प्रमुख पदी श्री. सुरेंद्र करंगुटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- ॲड सुभाष बाणे हे अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे संस्थापक सदस्य तसेच प्रथम अध्यक्ष होते.
- कुणबी सहकारी बँक मुंबईचे विद्यमान संचालक, कुणबी सहकारी बँक मुंबईचे लिगल ॲडव्हाजर (कायदेशीर स ल्लागार) आणि जवळपास गेली २० वर्षे मुंबई उच्च न्या यालयात एक यशस्वी, निष्णात वकील म्हणून परिचित आहेत.
- राजापूर तालुक्यातील शिवसेना संघटना अधिक मजबूत, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय निश्चितच पक्षवाढीसाठी दिशादर्शक ठरेल.
- नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी कार्यत त्परता, संघटनात्मक कौशल्य व निष्ठावंत नेतृत्वामुळे शि वसेनेची ताकद अधिक वाढेल असा ठाम विश्वास तालु क्यातील शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











