
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजापूरात मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबीर.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरववाडी, राजापूर आणि मधुतारा दिव्यांग सेवा सो शल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आ योजित भ.क.ल.वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महा विद्यालय यांच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबीर गुरुवार दि २३ जानेवारी २०२६ रोजी स.११ ते दु. २ वाजेपर्यंत जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरव वाडी राजापूर मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

- या शिबिरात हृदयविकार,युरोलाॅजी, अस्थिरोग, कॅन्सर श स्त्रक्रिया, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, स्त्रीरोग,कान,नाक व घ सा,जनरल सर्जरी यावर उपचार केले जाणार आहेत.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपचार मोफ त असून त्यांनी केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमा न भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आजार सामाविष्ट असल्यास रुग्णांना लाभ मिळणार आहे.
- अधिक माहितीसाठी विनय गुरव – 8087670449, विज य गुरव – 8329344715, पराग गुरव – 7620410332, रोहन गुरव – 9511279943 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरववाडी यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











