
राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे – सूर्यभान हाके.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा दि. 22 जाने वारी 2026 राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्ह णजे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे जात-पात न पाहता आम्ही सर्व भारतीय आहोत याची जाणीव निर्माण करणे असून विद्यार्थ्यांनी देशांमध्ये असमानता अं धश्रद्धा भ्रष्टाचार अशा घटना घडत आहेत.
- अशा घटना घडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा यो जना शिबिराच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत.

- यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन परंडा तालु का गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालया च्या मौजे बोडखा तालुका परंडा या गावी आयोजित केले ल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये निरोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वा खाली दि 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2026 दरम्यान श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शि क्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा व डॉ.बा बासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभा जी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बोडका या गावी वि शेष श्रमसंस्कार शिबिर पाणलोट व्यवस्थापन आणि पडी क जमीन विकास यावर शाश्वत युवा विशेष भर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
- निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्या लयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर व्यासपीठावर बोडखा गावचे सरपंच विठ्ठल करडे उपसरपंच नागनाथ काकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सु रेश चांदणे सहशिक्षक नागनाथ उकिरडे महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे मराठी वि भाग प्रमुख डॉ गजेंद्र रंदील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ अरुण खर्डे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिका री डॉ.दीपक तोडकरी प्रा जगन्नाथ माळी यांची उपस्थिती होती.
- या शिबिरामध्ये विद्यार्थी व समाज परस्पर संबंध या विष यावर डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी तर वृक्षारोपण काळाची गरज या विषयावर डॉ सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
- कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा फायदा या विषयावर तालुका कृषी अधिकारी एन एन लांडगे, समाज प्रबोधन ह भ प अशोक महाराज पाटील, बँकांचे कृषी विषयक धोरण या विषयावर डॉ.अरुण खर्डे यांनी मार्गदर्शन केले.
- दिनांक 21 जानेवारी रोजी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभा ग पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबि राचे आयोजन करण्यात आले होते.
- कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सात दिवसाचा वृत्तांत कार्यक्र माधिकारी डॉ दीपक तोडकर यांनी सांगितला.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डी जे पवार आणि कु. सानि का गायकवाड या विद्यार्थिनींनी केले याप्रसंगी प्रतिक्षा लि मकर प्रतीक्षा गवारे तसेच सहशिक्षक नागनाथ उकिरडे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने यांनी केला.

- शिबिर यशस्वी करण्यासाठी सह कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ.अरुण खर्डे डॉ.संभाजी गाते डॉ.विशाल जाधव डॉ स चिन चव्हाण डॉ शहाजी चंदनशिवे डॉ अमरसिंह गोरे पाटी ल व प्रा डॉ गजेंद्र रंदील यांनी तर कार्यक्रमाचे सहाय्यक म्हणून शिक्षकेतर कर्मचारी उत्तम माने संतोष राऊत धनं जय गायकवाड व श्रीमती सुनंदा कोठुळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक जगन्नाथ माळी यांनी मानले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











