
जिल्हा परिषद उर्दू प्रशाला परंडा येथे बाल आनंद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- दि.20 जानेवारी 2026 ये थिल जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, परंडा येथे मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
- या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी श्री.विटकर महादेव यांच्या हस्ते लाल फीत कापून करण्या त आले.

- यावेळी त्यांनी मेळाव्यास प्रोत्साहन म्हणून पाचशे रुपयां चे बक्षीस दिले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसे विका सौ. मुजावर आमिनाबी अबरार उपस्थित होत्या.
- तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या बागवान त ब्बसुम, शाहबर्फीवाले गजाला, शाहबर्फीवाले फरहिन यांची उपस्थिती लाभली.
- याशिवाय डोके बी.एच साधन व्यक्ती,श्री.गवळे बबन (केंद्र प्रमुख, तांदूळवाडी), श्री इंगळे रामचंद्र (मु. अ. प्रशाला, परंडा), श्री.पवार दिनकर (कन्या प्रशाला, परंडा),श्रीमती सय्यद यास्मिन (मु.अ.उर्दू प्रा.शा,परंडा), प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्यासह अनेक शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
- शाळेचे मुख्याध्यापक श्री खतीब ए.ए.यांच्या हस्ते उपस्थि त मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
- मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.बांगी जे.एम, श्रीमती समीना, श्री.लोधवाल व सौ.अंजली चंदनशिवे (शिंदे),आम रीन बाजी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास उप स्थित राहून शोभा वाढविल्याबद्दल आयोजकांतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











