शिवसेना शिंदे गटाकडून परंडा शहरात भव्य शक्तीप्रदर्शन; धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) कडून परंडा शहरात आज भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
  • पक्षाच्या अधिकृत धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर डों जा सर्कल जिल्हा परिषद उमेदवार नवनाथ आप्पा जगता प, सोनारी पंचायत समिती उमेदवार अमोल नलवडे तसेच डोंजा पंचायत समिती उमेदवार शशिकांत पाटील यांनी मोठ्या जल्लोषात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
  • सकाळपासूनच परंडा शहरात शिवसेना शिंदे गटाच्या का र्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
  • ढोल-ताशे, फटाके, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह असलेले फलक आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. “शिवसेना जिंदाबाद”, “एकनाथ शिंदे साहेब आगे बढो”, “धनुष्यबाणाचा विजय असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.
  • या शक्तीप्रदर्शनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, मा जी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
  • उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
  • यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “परंडा तालु क्यात विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही निवडणुकी च्या मैदानात उतरलो आहोत.
  • रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शेतकरी प्रश्न तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. जनतेच्या पाठिंब्याने धनुष्यबाणाचा विजय निश्चित आहे.”
  • शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करत एकजुटीचा संदेश दिला. “ही निवडणूक केवळ पदा साठी नसून विकासासाठी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृ त्वाखाली शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे.
  • परंडा तालुक्यातून मोठा कौल मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे त्यांनी नमूद केले.
  • अर्ज भरण्याच्या दिवशी झालेल्या या भव्य शक्तीप्रदर्शना मुळे परंडा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले अ सून, येत्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची ताकद कि ती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles