
घरकुल मंजूर होऊनही नऊ वर्षे प्रतिक्षा….! वेरवलीतील निराधार, विधवा महिलेचा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- लांजा तालुक्यातील एका निराधार विधवेला वेरवली,गावच्या तंटामुक्त समिती च्या सभेत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार घर बांधून दे ण्यास तब्ब्ल नऊ वर्षे वाट पहायला लावून घर बांधून दिले नाही, म्हणून मुबईत मोलमजुरी करून गावात घरकुल मं जूर करून घेणाऱ्या विधवेला जवळच्या नातेवाईकांनी सम्मती न दिल्याने घोर फसवणूक झालेल्या सत्तर वर्षीय निराधार विधवा महिलेने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

- जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदना मध्ये निराधार विध वा महिला दीपाली दीपक डोळस यांनी आपली दर्दभरी कहाणीच कथन करुन प्रशासनाला खडा सवाल व्यक्त केला आहे.
- गरीब निराधार अबलेला जगण्याचा हक्क नाही काय….?माझी व्यथा सुटणारच नाही का? कायदा गरीबाच रक्षणच करणार नाही काय.? प्रशासना समोर माझी भूमिका मला लेखी स्पष्ट मांडता येत नव्हती हिच माझी चूक होती का?असा प्रश्न केला आहे.
- कायदा दोन नंबर धंदे अवैध दारू धंदे, अवैध खैर विक्री करणाऱ्या माझ्या शेजारी, आणि नातेवाईकांना पाठीशी घालून मलाच मरण यातना देत आहे असा संताप व्यक्त केला असून सगळ्यांनी मिळून शडयंत्र रचले आहे.
- मला कोणीही आधार नाही मला माझी खरी बाजू असता ना मांडता आली नाही,मीं तहसिलदार, गटविकास अधि कारी लांजा पोलीस, मुबईत महिला आयोग वणवणं फिर त आहे.
- न्यायासाठी लढतेय पण मीच या सगळ्यांना त्रास देत आहे अशी माझी उलटी प्रतिमा करुन मला दोषी ठरवलं जात आहे. माझा दोष काय……?असा सवाल करून आपला विश्वासघात कसा केला गेला यांची खंत विस्तृत पणे निवेदना मध्ये व्यक्त केली आहे.
- या महिलेने तीला विरोध करणाऱ्या तिच्या विरोधक नाते वाईकांना घर बांधायला मात्र मीं यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला सन 2014 मध्ये बॉण्ड पेपरवर सम्मती करून दिली होती.
- मात्र मला फसविले गेले.असे निवेदनात म्हटले आहे सर्व नातेवाईका कडून आपला छळ केला जात असल्यामुळे मला न्यायासाठी व घरकुलच्या सम्मती साठी उपोषणास बसावे लागेल असा इशारा दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











