ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे 1 केबल चोर जेरबंद करण्यात रुई ग्रामस्थ व परंडा पोलिसांना यश.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा पोलिस स्टेश न हद्दीतील रुई तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे पहाटे 5:50 वाजता 4-5 चोर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी तून चोरीच्या उद्देशाने आलेले होते आणि गावातील बऱ्या च शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटरची केबल चोरून इत र आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले आणि एक आरो पी ती केबल जाळून त्याच्यातील तांब्याची तार वेगळी कर त शेजारील शेतामध्ये बसला होता.
  • गावातील संतोष व्यवहारे यांना एका शेतामध्ये जाळ दिस ला असता त्यांनी त्या व्यक्तीला जाऊन विचारना केली असता तो गडबडला,घाबरला आणि उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला की माझे शेत आहे नांगरायचे आहे.
  • त्यामुळे तुराट्या जळत आहे असे तो सांगत होता. शेतक ऱ्यांना शंका आली कारण त्यांना माहीत होते शेत कोणाचे आहे.
  • त्यामुळे त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही माहिती ता त्काळ गावचे माजी उपसरपंच सुमित राजेंद्र लिंकरपाटील यांना कळवली आणि त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्प लाइन (18002703600) नंबरवरून सर्व गावांला आणि परंडा पोलीस स्टेशनला कळवली.
  • त्यामुळे तात्काळ रुई ग्रामस्थ व परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले साहेब यांच्या आदेशा न्वये परंडा पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटना स्थळी दाखल झाले.
  • गावकरी घटनास्थळी दाखल झालेले आहेत हे लक्षात ये ताच,तो चोर शेजारील ऊसामध्ये पळून गेला;परंतु गावक ऱ्यांनी एकत्र येत पाठलाग करून ऊसाच्या आतमध्ये जा ऊन चोराला पकडले आणि त्याच्याकडील टू व्हीलरसह पोलिसांच्या स्वाधीन केले.
  • सदर घटनास्थळी सदर बीटचे बीट अंमलदार विश्वनाथ शिं दे, भुजंगराव आडसूळ,सादू शेवाळे, पोलीस पाटील विला स पाटील, माजी उपसरपंच सुमित लिंकर पाटील, संतोष व्यवहारे यांच्यासह रुई ग्रामस्थ उपस्थित होते.
  • रुई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्ना तून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे.
  • आजपर्यंत रुई गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी 17 वेळा वापर करण्यात आला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles