मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथील शाळेत इयत्ता चौथीची बालसभा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-प्रशालेतील इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन या विषयावर बाल सभेचे आयोजन केले होते.
  • 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या स्वतंत्र भारताचे संवि धान अमलात आले त्या घटनेला 76 वर्षे पूर्ण झाली.
  • त्याचेच औचित्य साधून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन केले होते.
  • या बालसभेचे अध्यक्षस्थान कु.अक्षता भिसे या विद्यार्थि नीने भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिशू विद्यामंदि राच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता घुले उपस्थित होत्या.
  • व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री.पांडूरंग मराडे, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुजाता कुलकर्णी, पालक सं घाच्या उपाध्यक्षा सौ.शारदा हागे व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. पूनम वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  • बालसभेचे सूत्रसंचालन कु.अरमिता गलगले हिने केले. प्रा स्ताविक चि.राजवीर निंबाळकर याने केले. आलेल्या प्रमु ख पाहुण्यांचा परिचय व सत्कार कु.ज्ञानेश्वरी कुटे हिने करून दिला.
  • त्यानंतर कु.श्रद्धा म्हेत्रे, कु.अनुष्का किसवे, चि.आयुष कुं भार, कु.सानवी सावंत, कु.शिवानी हागे, कु.प्रणाली गळग टे, कु.हिताक्षी चोपडे, चि.प्रणव सादोळकर, चि.चैतन्य वा घ आणि कु.रेवा कुरळे या सर्व विद्यार्थ्यांनी भारताचे संवि धान या विषयावर सविस्तर चर्चा करून बालसभेत सहभा ग घेतला.
  • प्रमुख पाहुण्या सौ.संगीता घुले यांनी शालेय जीवनातच स भाधीटपणा येण्यासाठी बालसभेसारखे उपक्रम घेणे हिता चे असते असे विचार व्यक्त केले.
  • मुख्याध्यापक श्री.पांडुरंग मराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्श न केले.
  • या बालसभेच्या यशस्वीतेसाठी इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक श्री.कैलास माळी ,सौ.जोगेश्वरी पैलवान व श्रीमती वैशाली आटोळे यांनी परिश्रम घेतले.
  • बालसभेच्या शेवटी कु.नमिता बोऱ्हाडे हिने सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे आभार मानले. सर्व विद्या र्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देऊन आनंद व्य क्त केला व बालसभेचा शेवट पसायदानाने करण्यात आला.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.श्री.गजानन एकबोटे,श्री.मान सिंग साळुंके, श्री.प्रमोद शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभे च्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles