ग्रामदेवता मंदिर जिर्णोद्धार निधीसाठी खरवते सेवा संघातर्फे १ फेब्रुवारीला मुंबईत नमनाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यातील खरवते गावातील ग्रामदेवता मंदिर जिर्णोद्धार निधी संकल नासाठी रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री.शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे शाहीर विनोद फटकरे निर्मित श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, मुं बई (मढाळ गुहागर) यांच्या नमनाच्या कार्यक्रमाचे आयो जन करण्यात आले आहे.
  • खरवते सेवा संघ (रजि) ही सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून ग्रामविकासासाठी सातत्या ने प्रयत्नशील आहे.
  • संघाने यावेळी ग्रामदेवता मंदिर जिर्णोद्धार निधी संकलना साठी पुढाकार घेतला असून त्याअनुषंगाने सदर नमनाचा प्रयोग आयोजित केला आहे.
  • काळेश्वरी नाट्य नमन मंडळ हे कोकणासह मुंबई गाजले ले नमन असून ‘स्वयंवर राजाचा’ हे धमाल विनोदी तुडतु डीत लोकनाट्य रसिकांना नक्कीच भुरळ पाडेल.
  • नमन कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्री सुरेश ग.चौगु ले – ९३२०३३४१०५, श्री सुनील म.चौगुले – ८७६६९२३० २१, श्री संकेत ग.ठीक – ८३६९३७३५७४, श्री संतोष स. चौगुले – ७७३८३४८५३८, श्री विजय रा.गुरव – ९३७२४२ १२ ८१, श्री संजय म. कुंभार – ८१६९१९२८३१ या भ्रमण ध्व नीवर संपर्क साधावा सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिर्णोद्धार निधी संकलनासाठी हातभार लावावा असे आवाहन संयोजक खरवते गावकर मंडळी, ग्रामस्थ बंधू-भगिनी, खरवते सेवा संघ सन्मा. सदस्य आणि तरुण मंडळी यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles