
डॉ.तानाजीराव सावंत यांनी सोनारी येथील भैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला केली सुरवात.
- प्रतिनिधी : फारुख शेख :- परंडा तालुक्यातिल श्रीक्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथांचे दर्शन घेऊन, परंडा तालु क्यातील शिवसेना पक्षाच्या डोंजा जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ.अविदाबाई भागवत जगताप, पंचा यत समिती डोंजा गणाचे अधिकृत उमेदवार शशिकांत चं द्रकांत पाटील, आणि पंचायत समिती सोनारी गणाचे अ धिकृत उमेदवार समाधान सुभाष नलवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला, महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नारळ वाढवण्यात आला.
- याप्रसंगी सावंत साहेबांनी उपस्थित जनसमुदायाला व का र्यकर्त्यांना प्रचारासंदर्भात सखोल मार्गदर्शन करून तिन्ही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
- आपल्या भूम-परंडा-वाशी तालुक्याच्या सर्वांगीण विकासा साठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- ते पुढे म्हणाले की, ही निवडणूक केवळ उमेदवार निवड ण्याची नसून, आपल्या गटाची, गणाची आणि गावाच्या भविष्याची दिशा ठरवणारी आहे.
- ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण विकासाची अपेक्षा करू शकतो,अशा सक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जोडलेल्या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन बळकट करा.
- येणाऱ्या सात फेब्रुवारीला ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विज यी करा.
- यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, आरपीआय प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, मा.जि.प.सभापती नव नाथ आप्पा जगताप, रामचंद्र घोगरे सर, सोनारी मा. उपस रपंच अंगद आबा फरतडे, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, ॲड.रणजीत खरसडे, पै.विशाल नाना देवकर, बाला जी नेटके, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, रोसा सरपंच रवींद्र नल वडे, कुंबेजा सरपंच शिवाजी मिसाळ, गोकुळ चव्हाण, ल क्ष्मण मोरे,शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसै निक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











