नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गौतम अदानींना सर्वात मोठा झटका; बड्या फ्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प थांबवला – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

गौतम अदानींना सर्वात मोठा झटका; बड्या फ्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प थांबवला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर : नितीन राने :- फ्रान्सच्या Total Energies या बड्या कंपनीने मोठा धक्का देत अदानींच्या ५० अब्ज डॉलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पातील आपला सहभाग सध्यातरी थांबवला आहे.
big shock to gautam adani
  • हायलाइट्स:
  • गौतम अदानी यांना मोठा धक्का.
  • फ्रान्सच्या total eneg कंपनीने प्रकल्प थांबवला.
  • प्रकल्पावर कोणतीही स्वाक्षरी झालेली नव्हती- पॅट्रिक पॉया.
  •  हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अडचणीत सापडलेले अब्जाधीश गौतम अदानी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
  • अदानी यांच्या व्यवसाय साम्राज्यातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या TotalEnergies या बड्या कंपनीने मोठा धक्का देत ५० अब्ज डॉलर्सचा प्रकल्पातील आपला सहभाग सध्यातरी थांबवला आहे.
  • अमेरिकेच्या शॉर्ट-सेलरच्या आरोपानंतर सुरू झालेल्या ऑडिटचे निकाल प्रलंबित असलेल्या भारतीय समूहाच्या $५० अब्ज हायड्रोजन प्रकल्पातील सहभाग थांबवला आहे.
  • गेल्या वर्षी जूनमध्ये या फ्रान्सच्या कंपनीकडून अदानी समूहासोबतच्या भागीदारीची घोषणा करण्यात आली होती.
  • तरीही टोटल एनर्जीजने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही, असे फ्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिक पॉयाने यांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
  • जून २०२२ च्या घोषणेनुसार, TotalEnergies ही मोठी कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मध्ये २५ टक्के इक्विटी घेणार होती.
  • ग्रीन हायड्रोजन इकोसिस्ट विकसित करण्यासाठी ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून सन २०३० पर्यंत १० लाख टन हरित ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट अदानी समूहाने ठेवले होते.
  • जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत हायड्रोजन प्रकल्प थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे पॉयाने यांनी स्पष्ट केले आहे.
  • अदानी समुहात ३.१ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक असलेली TotalEnergies ही कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने लावलेल्या लेखा आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अडचणीत आली आहे.
  • आता कंपनी अदानी समूहाच्या ऑडिट रिपोर्टची वाट पाहत आहे. अदानी समूहाने या हिंडनबर्गने केलेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत इन्कार केला असून, त्यांना दुर्भावनापूर्ण आणि “भारतावरील हल्ला” म्हटले आहे.
  • या भागिदारीची केवळ घोषणा करण्यात आलेली होती, मात्र प्रकल्पाच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यात आली नव्हती, असे पॉयने यांनी म्हटले आहे.
  • अदानी यांच्याकडे आता हाताळण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत, ऑडिट करण्याचे काम सुरू असताना अशा स्थितीत गोष्टींना विराम देणे चांगले आहे, असे पॉयने यांनी म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा