
तहसील कार्याल परंडा/पंचायत समिती/गटशिक्षण कार्यालयास संत रविदास महाराज जयंतीचा विसर पडला….?
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- सामाजिक समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रवीदास महाराज यांची जयंती दरवर्षी शासकीय स्तरावर साजरी केली जाते.

- मात्र यंदा पंचायत समिती परंडा तसेच गटशिक्षण कार्याल य परंडा येथे संत रवीदास महाराज जयंती साजरी न झा ल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
- याबाबत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंचायत समिती व गटशिक्षण कार्यालयातील बहुतांश अ धिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामासाठी बाहेर गावी नियुक्त करण्यात आले होते.

- त्यामुळे जयंती साजरी करण्याचे नियोजन करता आले ना ही, असे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
- संत रविदास दास महाराज यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता, अन्याय व अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समतेचा, बंधुतेचा संदेश दिला.
- अशा थोर संतांची जयंती शासकीय कार्यालयांमध्ये साज री करणे हे प्रशासनाचे सामाजिक व नैतिक कर्तव्य आहे.

- मात्र महत्त्वाच्या कारणास्तव जयंती साजरी न झाल्याने नागरिक व विविध सामाजिक संघटनांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
- भविष्यात अशा प्रकारे थोर संतांच्या जयंतीकडे दुर्लक्ष हो ऊ नये, तसेच मतदान प्रक्रिया असली तरी पर्यायी नियोज न करून जयंती साजरी करावी,अशी मागणी तालुका संघ टनेचे राष्ट्रीय चर्मकार तालुका अध्यक्ष कानिफनाथ सरपने केली आहे.

- ( अधिकारी क्रमच्यारी निवडनूकीच्या कामात आसल्याने रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलि नाही. सूर्यभान हाके गट शिक्षण माधिकारी )
- सर्व कर्मच्यारी आम्ही निवडनूक कामात आसल्याने संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. गटविकास अधिकारी विनोद जाधव )
- ( तहसीलदार यांना मोबाईल द्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. )
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











