
वलजाईवाडी प्रिमियर लीग-२०२६ चा वलजाई स्टार्स संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी.
- प्रतिनिधी : दापोली : प्रमोद तरळ :-तालुक्यातील कुडा वळे वलजाई वाडी यांच्या वतीने “वलजाईवाडी प्रिमियर लीग” (VPL) २०२६ पर्व दुसरे या क्रिकेट स्पर्धेचे आयोज न दि.२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी वलजाई वाडी येथी ल मैदानात केले होते.
- सदर स्पर्धेतील अंतिम सामन्यात वलजाई स्टार्स संघाने व लजाई किंग्स संघाचा पराभव करत वलजाईवाडी प्रिमियर लीगच्या चषकावर आपले नाव कोरले.

- वलजाई किंग्स संघ हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. वलजाई ईलव्हन संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
- तर वलजाई वॉरियर्स संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविले. विजेत्या संघांना रोख बक्षीस आणि आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
- ऋषिकेश चांदे(वलजाई स्टार्स १८७ धावा) याला मालिका विर व सर्वोत्कृष्ट फंलदाजाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- सर्वोत्कृष्ट गोलंदाज गणेश बैकर (वलजाई इलेव्हन ९ विके ट्स), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुशांत जाधव, उगवता तारा अ थर्व प्रमोद बैकर या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
- सदर स्पर्धेसाठी संपूर्ण V.P.L. कमिटी आणि वाडीतील मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ, त्यांचे सर्व पदाधिकारी, तसेच सर्व देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
- ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून V.P.L.क्रिकेट कमिटीचे स ल्लागार राकेश बैकर, अध्यक्ष उदय बैकर, उपाध्यक्ष ॲड. अमोल बैकर, सचिव रुपेश घुबडे आणि सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
- तसेच V.P.L. मधील सर्व खेळाडू, संघमालक आणि सर्व कप्तान यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले.
- विशेषतः म्हणजे गावातील सर्व मुलांनी सर्व महिला आणि मान्यवरांचे आभारमानून स्पर्धेची सांगता करण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











