
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: खासदार ओमराजे निंबाळकर यांची उद्या कंडारी येथे जाहीर सभा.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- धाराशिव जिल्हा परिषद आ णि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा आता संपूर्ण जिल्ह्यात उडू लागला असून,शिवसेनेचे(ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराची जोरदार आ घाडी घेतली आहे.
- उद्या, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता कंडारी येथे त्यांची भव्य जाहीर प्रचार सभा आयो जित करण्यात आली आहे.

- नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीतील निकालां नंतर खासदार ओमराजेंनी थेट जनतेच्या दरबारात जा ण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी सत्ताधारी महायुतीवर आणि विशेषतः आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वर टीकेची झोड उठवली आहे.
- काही दिवसांपूर्वीच त्यांनी मल्हार पाटील यांच्या आव्हाना ला प्रत्युत्तर देत जिल्हा परिषदेत ताकद दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
- सभेचा तपशील:
- दिनांक: ४ फेब्रुवारी २०२६
- वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
- ठिकाण: कंडारी, ता. धाराशिव
- या सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात आणि विरोधकांवर कोणत्या मुद्द्यां वरून निशाणा साधतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ला गले आहे.

- या सभेला तालुक्यातील शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











