चुलता-पुतण्या भिडले…! जवळा सर्कलमध्ये राजकीय ठिणगी; मतदारांची मात्र करमणूक.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद सर्कल सध्या राजकीय आखाड्या चे केंद्र बनले आहे.
  • या मतदारसंघात चुलता आणि पुतण्या एकमेकांसमोर नि वडणुकीच्या रणधुमाळीत घरगुती वादाची आणि राजकी य इर्षेची मोठी ‘ठिणगी’ पडली आहे.
  • रक्ताच्या नात्यात पडलेल्या या राजकीय भेगांमुळे गावागा वात सध्या एकच चर्चा रंगली असून मतदार मात्र या “तमाशाचा” आनंद घेत कोणाचे पारडे जड ठरेल, याकडे लक्ष लावून बसले आहेत.
  • नेमका प्रकार काय?
  • गेल्या काही दिवसांपासून जवळा सर्कलमध्ये प्रचाराचा ध डाका सुरू आहे. मात्र, एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे चुलता आणि पुतण्या आता एकमेकांच्या उणिवा काढण्यात व्यस्त आहेत.
  • भाषणांमधून होणारी चिखलफेक आणि वैयक्तिक टीकेमु ळे निवडणुकीतील गांभीर्य बाजूला पडून कौटुंबिक कलह चव्हाट्यावर आला आहे.
  • एकाच घरातील दोन वारसदार आमनेसामने आल्याने का र्यकर्तेही विभागले गेले असून कोणता झेंडा हाती धरावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
  • मतदार काय म्हणतात?
  • राजकीय धुरळा उडाला असताना सर्वसामान्य मतदार मा त्र हा सर्व प्रकार शांतपणे बघत आहेत. “घरचं भांडण भर रस्त्यावर” आल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.
  • सोशल मीडियावरही या वादाच्या क्लिप्स व्हायरल होत असून चुलत्याचा अनुभव कामाला येणार की पुतण्याचा जोश बाजी मारणार, यावर पैजा लावल्या जात आहेत.
  • कोण मारणार बाजी?
  • चुलता आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर मतदारांना साद घालत आहे, तर पुतण्याने ‘बदलाचा वारे’ वाहत अस ल्याचे सांगत तरुणाईला साद घातली आहे.
  • जवळा सर्कलच्या या हायव्होल्टेज लढतीत चुलत्याचे वर्च स्व टिकणार की पुतण्या नवा इतिहास घडवणार,हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles